'परिवर्तन'चा नाट्य महोत्सव रंगणार पुण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:28 PM2019-11-18T17:28:14+5:302019-11-18T17:28:32+5:30
जळगाव - 'परिवर्तन' जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव पुणे येथे होणार आहे़ २४ ते २६ ...
जळगाव - 'परिवर्तन' जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव पुणे येथे होणार आहे़ २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे़
पुण्यात तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता 'अरे संसार संसार' हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. लेवागण बोली मधील बहिणाबाईची कविता खान्देशामधील कलावंत आपल्या बोलीमधून उलगडणार आहेत़ संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे असणार आहे़ या कार्यक्रमात मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, भूषण गुरव, योगेश पाटिल, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर आणी शंभू पाटील हे कलावंत असणार आहेत. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी आहेत.
'नली' ही होणार सादर
दरम्यान, विविध प्रयोगानंतर 'नली' या हर्षल पाटील अभिनीत एकल नाट्याचा प्रयोग होणार आहे. तसेच २५ रोजी सायंकाळी ७ वाजता शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित 'गांधी नाकारायचाय... पण कसा ?' हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटिल, विजय जैन सादर करणार आहेत. निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी आहेत़ तर २६ रोजी 'अमृता, साहिर, इमरोज' हे दिर्घनाट्य होईल़ होणार आहे . संकल्पना राहुल निंबालकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील हे कलावंत सादर करणार आहेत़