पुण्याचे आयुर्वेदाचार्य वैद्य प्रवीण पाटील रविवारी जळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:35+5:302021-01-23T04:16:35+5:30
जळगाव : पुण्याचे आयुर्वेदाचार्य तथा नाडी तज्ज्ञ वैद्य प्रवीण पाटील हे आपल्या श्री विश्व आयुर्वेदामृत या आयुर्वेदीय पंचकर्म ...
जळगाव : पुण्याचे आयुर्वेदाचार्य तथा नाडी तज्ज्ञ वैद्य प्रवीण पाटील हे आपल्या श्री विश्व आयुर्वेदामृत या आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र पुणे अंतर्गत जळगाव येथे ढाके कॉलनीतील डॉ. उभाड पाटील मुलांचे व डोळ्यांचे हॉस्पिटल येथे रविवार, २४ जानेवारी रोजी ते सेवा देणार आहेत. नाडी परिक्षणाने परिपूर्ण अशा आयुर्वेदीय चिकित्सेने असंख्य रुणांना त्यांनी पूर्णपणे बरे केले आहे. काहींच्या शस्त्रक्रियाही वाचल्या आहेत. इच्छुकांनी सकाळी ९ ते संध्याकाळी सात या वेळेत लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमान्य हॉस्पिटलतर्फे प्रथमच सुपरस्पेशालिटी आर्थो ओपीडी
जळगाव : गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, खुब्याचे विकार आणि मुख्यत: लहान मुलांचे अस्थिविकार, अस्थिव्यंग यासारख्या आजारांवर तपासणी मार्गदर्शन व अत्याधुनिक उपचार करण्यासाठी मेहरुण परिसरातील हयात अँक्सिडेंट हाॅस्पिटल, बिलाल मशिदजवळ येथे ‘लोकमान्य आर्थो सुपरस्पेशालिटी ओपीडी’ प्रथमच सुरू करण्यात येत आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विवेक सोधाई हे शनिवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता तपासणी, मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. गुडघेदुखीबरोबरच पाठदुखीसाठी याठिकाणी तपासणी होणार असून मिनिमल इन्हॅसिव्ह स्वरुपातील उपचार रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. स्लीप डिस्क, स्पाँन्डेलायसिस, मणक्याच्या चकतीत गॅप येणे यासारख्या आजारांची तपासणी येथे केली जाणार आहे. लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.