पंजाबराव उगले जळगावचे नवे पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:36 PM2019-02-25T12:36:28+5:302019-02-25T12:41:11+5:30
राज्य शासनाने रविवारी रात्री पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची मुंबई महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुरक्षा व अमलबजावणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची नियुक्ती झाली आहे.
जळगाव : राज्य शासनाने रविवारी रात्री पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची मुंबई महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुरक्षा व अमलबजावणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची नियुक्ती झाली आहे.
चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे. बच्छाव यांच्या जागी धुळे राज्य राखीव बलाचे समादेशक सचिन गोरे यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नाशिक राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे. जळगावचे तत्कालिन पोलीस अधीक्षक तथा मुंबई दहशतवाद विरोध पथकाचे उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची ठाणे येथे प्रादेशिक विभागात अपर पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर चोरुन झालेले चित्रीकरण भोवल्याची चर्चा आहे. बच्छाव हे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव उपविभागात उपअधीक्षक पदावर होते. त्यामुळे ते देखील बदलीस पात्र होते.