पारोळा बडोदा बँकेच्या व्यवस्थापकसह पंटरला २ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:11 PM2020-09-04T21:11:45+5:302020-09-04T21:12:01+5:30

लाचप्रकरणी अटकेत

Punter along with manager of Parola Baroda Bank remanded in police custody for 2 days | पारोळा बडोदा बँकेच्या व्यवस्थापकसह पंटरला २ दिवसांची पोलीस कोठडी

पारोळा बडोदा बँकेच्या व्यवस्थापकसह पंटरला २ दिवसांची पोलीस कोठडी

Next


अमळनेर/ पारोळा : पारोळा येथील शेतकऱ्याच्या कर्ज मंजुरीसाठी ७५ हजाराची लाच धनादेशद्वारे स्वीकारणारा बडोदा बँकेचा व्यवस्थापक व त्याच्या पंटरला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईत घरातील १० लाख रुपये आढळल्याने त्याने अनेकांना लुबाडलयाचा संशय बळावल्याने सरकारी वकिलांनी चौकशीसाठी कोठडीची मागणी केली.
पारोळा येथील शेतकºयाच्या सात लाख १० हजार रुपये कर्जाच्या मंजुरीपोटी बडोदा बँकेचा व्यवस्थापक किरण ठाकरे याने ८ टक्के प्रमाणे लाच मागितली व बेअरर चेक घेऊन स्वत: ५० हजार व पंटरला २५ हजार दिले. शेतकºयाच्या तक्रारीनुसार पुणे येथील सीबीआयचे अधीक्षक भगेंद्र कढोले, सतीश बोराडे यांनी बडोदा बँकेचा व्यवस्थापक किरण ठाकरे व पंटर नरेंद्र पाटील याना रंगेहात पकडून व्यवस्थापकाच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरात १० लाखाची रोकड सापडली. दोघाना अटक केल्यावर शुक्रवारी त्यांना सीबीआयचे निरीक्षक आनंद रुईकर यांनी अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील अ‍ॅड शशिकांत पाटील यांनी आरोपीकडे १०लाख रुपये सापडले असून त्याने अजून काही ग्राहकांना लुटले किंवा फसवले असण्याची शक्यता असून त्याच्याकडे ज्ञात स्रोतापेक्षा अधिक रक्कम असू शकते म्हणून चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला त्यावर न्या. व्ही. आर. जोशी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यवस्थापक ठाकरे हे दोन वर्षापासून पारोळ्यात
अटकेत असलेले आरोपी किरण ठाकरे हे पारोळा शहरातील व्यंकटेश नगर येथे आपल्या परिवारासह राहतात. ते पारोळा शाखेत गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान त्यांच्या गैरहजेरी तशुक्रवारी पारोळा शाखेत व्यवहार पूर्वपदार होते मात्र तूर्त दुसºया शाखा व्यवस्थपकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. या सीबीआयच्या धाडीच्या प्रकाराने शहरात हा विषय दिवसभर चर्चेत राहिला. दरम्यान ज्यांची कर्ज प्रकरणे मंजूर आहेत त्यांना या प्रकारामुळे कर्ज मिळण्यास अडथळे येऊ शकतात अशी शंका व्यक्त होत आहे.

Web Title: Punter along with manager of Parola Baroda Bank remanded in police custody for 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.