१५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह पंटर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:43 PM2019-09-23T19:43:07+5:302019-09-23T19:59:08+5:30

मेहुणबारे येथील हाणामारीच्या गुन्ह्यातील ३५४ हे वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. शालिग्राम व्यंकटराव कुंभार व खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

Punters were seized with a police officer while receiving a bribe of Rs | १५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह पंटर ताब्यात

१५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह पंटर ताब्यात

Next
ठळक मुद्देचाळीसगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा समावेशविनयभंगाचे वाढीव कलम न लावण्यासाठी पैशांची मागणी

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील मेहुणबारे येथील हाणामारीच्या गुन्ह्यातील ३५४ हे वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. शालिग्राम व्यंकटराव कुंभार व खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्याचे असे झाले की, मेहुणबारे पोलीस ठाण्यात भाग पाच, गु.र.नं.१६४/२०१९, भा.दं.वि.कलम ३२४, ३२३, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील भा.दं.वि. कलम ३५४ हे वाढीव कलम न लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पो.हे.काँ.शालिग्राम कुंभार यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने ही रक्कम देण्यास असमर्थता दाखवून त्याबाबतची तक्रार जळगाव लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार २३ रोजी सापळा रचण्यात आला. खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख (रा.चाळीसगाव) याने १५ हजार रुपयाची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.ना. मनोज जोशी, सुनील शिरसाठ, पो.काँ.प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Punters were seized with a police officer while receiving a bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.