व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:48 PM2020-03-31T16:48:18+5:302020-03-31T16:48:25+5:30

संचारबंदीतील अडचणींचे निमित्त : दररोज १५० ते २०० ट्रकची केळी वाहतूक मात्र सुरूच

Purchase of bananas at prices of merchants | व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात केळीची खरेदी

Next

रावेर : देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना नाशवंत फळ म्हणून केळीची देशांतर्गत वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दररोज १५० ते २०० ट्रक केळीची उत्तर भारतात निर्यात केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पाच सहा दिवस केळी वाहतूक न झाल्याने केळीबागेत साठलेल्या केळीमालाची ४०० ते ४५० रूपये प्रतिक्विंटल अशा कमी भावाने खरेदी झाली होती. आता मात्र नियमित व गुणात्मक दर्जाच्या केळीमालालाही तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कमी भावात अर्थात उत्पादन खचार्पेक्षाही कमी भावात व्यापारीवर्गाने भाव देत कोरोनाचे भूत नाचवून केळीची लयलूट सुरू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक मणका मोडला जात आहे.
संचारबंदीत आरंभीच्या पाच -सहा दिवसात कापणीवरील नवती केळी बागांमध्ये केळी माल संचित झाला होता. केळी मजूरांना घराबाहेर पडता येत नसल्याने व जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूकीअभावी केळी मालाची धुळघाण होते की काय? अशी आशंका होती. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार शिरीष चौधरी तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून केळी वर्गाने बागांमध्ये संचित झालेल्या केळीमालाची गुणवत्ता ढासळल्याने केळी बाजार समितीचे भाव ११७० रू प्रतिक्विंटल असतांना ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल एवढ्या कमी दरात खरेदी करून उत्तर भारतात केळी निर्यात केली.
या तीन- चार दिवसात ५०० ट्रक वा अवजड ट्रेलरद्वारे आठ हजार ७५० टन केळीमालाची उत्तर भारतात निर्यात झाली. परिणामत: केळी बागांमध्ये आता पुर्वसंचित केळीमालाची उपलब्धता संपून नियमीत कापणीवरील गुणात्मक दर्जाची केळी कापणीवर आल्याने केळीच्या बाजारभावांची परिस्थिती कोरोनाच्या संचारबंदीतील संभाव्य धोके गृहीत धरून केळी उत्पादकांच्या पदरात दोन पैसे पडतील या हेतूने सुधारण्याची गरज होती. मात्र, कोरोनाचा मोठा बाऊ करत व्यापारी हे केळीमाल उतरवणारा मजूर उपलब्ध नसल्याने तसेच परतीचे भाडे नसल्याने ट्रकवाल्यांना जादा भाडे देवून केळी माल उतरवण्याची शाश्वती नसल्याने केळी ४०० ते ४५० रू प्रतिक्विंटल भावातच खरेदी करणे परवडत असल्याचे सांगत आहेत. मात्र आजही रावेर तालूक्यातून १५० ते २०० ट्रक रवाना झाल्याचे चित्र असल्याने बाजारपेठेत केळीची मागणीही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
संचारबंदीत शिथीलता मिळाल्यानंतरच्या फळ -भाज्या चढ्या भावाने विकल्या जात असतांना व त्यात केळी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असल्याची बाजारपेठेत चर्चा असतांना, केळीला मागणी नसल्याबाबत कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून केळी उत्पादकांची लयलूट होत असल्याची भीषण वास्तवता आहे. तत्संबंधी स्थानिक केळी व्यापाºयांनी जगावर कोरोनाच्या कोसळलेल्या संकटात केळी उत्पादकांना किमान उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडेल एवढा तरी केळी भाव मिळवून देण्यासाठी घाऊक खरेदीदार व्यापाºयांशी भांडून राष्ट्रीय आपत्तीत केळी उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
मजूर जिल्हाबंदीत सोलापूरला अडकले
रावेर तालूक्यात निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळीमालाची उपलब्धता होवून आखाती राष्ट्रात केळी निर्यातीची संधी असतांना मात्र कोरोनाच्या शटडाऊन मुळे जिल्हा बंदीत केळी निर्यातीचा तंत्रकुशल मजूर सोलापूर जिल्ह्यात अडकून पडला आहे. सदर २०० मजूर सोलापूर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.

Web Title: Purchase of bananas at prices of merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.