जळगावात यंदा दिवाळी खरेदी 160 कोटीवर, सुवर्ण बाजाराला 100कोटीची झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:17 PM2017-10-22T12:17:43+5:302017-10-22T12:19:08+5:30

दुचाकी, चारचाकी, फ्रीज, वाशिंग मशिनलाही मागणी

The purchase of Diwali 160 crores | जळगावात यंदा दिवाळी खरेदी 160 कोटीवर, सुवर्ण बाजाराला 100कोटीची झळाळी

जळगावात यंदा दिवाळी खरेदी 160 कोटीवर, सुवर्ण बाजाराला 100कोटीची झळाळी

googlenewsNext
ठळक मुद्देकापड बाजारात 7 कोटींची उलाढाल इलेक्ट्रॉनिक बाजारात 12 कोटींची उलाढाल   किराणा-मिठाईत 4 कोटींर्पयत उलाढाल  

विजयकुमार सैतवाल/ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 -  दिवाळीतील सर्व सहा दिवसांच्या मुहूर्तावर यंदा मोठय़ा प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी होऊन दिवाळी खरेदी 160 कोटींवर पोहचली. बाजारात  यंदा केवळ सोन्यामध्येच 100 कोटींची उलाढाल होऊन दुचाकी, कार, फ्रीज, वाशिंग मशिन यांनाही मोठी मागणी राहिली.   फटाक्यांची  विक्री मात्र यंदा निम्म्यावर आली आहे. दरवर्षी 20 कोटींची उलाढाल होते ती यंदा 10 कोटींवर आली आहे.  
अनेक वित्तीय संस्थांकडून ‘ङिारो’ व्याज दराने  आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे होणारा व्याजपुरवठा व इतर योजनांमुळे वाहन व इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ गजबजून गेली.  यंदाच्या दिवाळीत  एकूण किमान 160 कोटींच्या वर उलाढाल झाल्याचे चित्र आहे.   
इलेक्ट्रॉनिक बाजारात 12 कोटींची उलाढाल   
इलेक्ट्रॉनिक बाजारात 12  कोटींची उलाढाल झाली.  यंदा फ्रीज, वाशिंग मशिनमध्येच 60 टक्के ग्राहकी राहिली. त्या खालोखाल एलईडी, एसी इत्यादी वस्तूंना  40 टक्के ग्राहकी होती.     
14 कोटींच्या दुचाकींची विक्री    
बँका व पतपेढय़ा आणि खाजगी वित्त संस्थांमध्ये  पतपुरवठा करण्यात स्पर्धा वाढल्याने  इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन बाजारात अधिक गती आली आहे. यावर्षी किमान  14 कोटींच्या दुचाकीची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे.   शहरातील एकाच शोरुममध्ये दिवाळीच्या सहा दिवसात एक हजार दुचाकींची विक्री झाली.  तसेच इतर शोरुमचा आकडा मिळून दोन हजाराच्यावर दुचाकींची विक्री झाली.  काही कंपन्यांच्या निवडक दुचाक्यांचा स्टॉक आगावू मागवून ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी विक्रेत्यांनी प्रयत्न केला.     
कापड बाजारात 7 कोटींची उलाढाल 
 कापडांमध्ये रेडिमेडकडे वाढता कल कायम आहे.  शोरूम व फर्मची संख्या लक्षात घेता त्यात  7 कोटींची उलाढाल  झाली. यामध्ये बच्चे कंपनीचे रेडीमेड कपडय़ांचेही दर मोठय़ा प्रमाणात वधारल्याने उलाढालीचा आकडा वाढला आहे.       
सराफ बाजाराला सुवर्ण झळाली 
सोने खरेदीला सुवर्णनगरी जळगावात विजयादशमीपासून झळाली मिळाली आहे. दिवाळीमध्ये प्रत्येक मुहूर्त यंदा स्वतंत्र दिवशी आल्याने प्रत्येक दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होती.  सोन्यात 50 टक्के ग्राहकी मणी-मंगळसूत्र, अंगठी, पाटल्या, कर्णफुले इत्यादीमध्ये होती.  150 फर्ममध्ये 100 कोटींची झाली असून  सुवर्ण बाजारातील गेल्या वर्षभराची मरगळ दूर झाली आहे.     
अजून आठवडाभर गर्दी कायम राहणार 
 सुवर्ण बाजारात अजून आठ दिवस गर्दी कायम राहणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील माहेरवासीणी येथे आल्यानंतर वर्षभरातील केलेल्या बचतीतून जळगावातील सोने खरेदी करतात. जळगावच्या लेकी राज्यात अथवा इतरत्र कोठेही असल्या तरी भाऊबीजेसाठी माहेरी आल्यानंतर त्या जळगावातूनच सोने खरेदी करून नेतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. 
पॅनकार्डची सक्ती हटविल्याने वाढली उलाढाल
सोने खरेदीमध्ये दोन लाखाच्यावर खरेदी केल्यास पॅनकार्ड सक्तीचे होते. मात्र ही अट मागे घेतल्यानेही सुवर्ण खरेदीला  वेग आल्याचे सांगितले जात आहे.     
किराणा-मिठाईत 4 कोटींर्पयत उलाढाल  
यंदा फराळाच्या साहित्यालाही मोठी मागणी राहिली. वाजवी, रास्त दरात फरसाण व मिठाई विक्रीचे अनेक स्टॉल शहरात लावण्यात आले होते.   एकूण मिठाईत 2 कोटीर्पयत उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.  त्यात निम्मे ग्राहकी माव्याच्या पदार्थाची व अध्र्यामध्ये फरसाण 25 टक्के, मैदा व बेसनपीठाचे पदार्थ 25 टक्के आहे. दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, कामगार वर्ग बाजारपेठेतील उलाढालीचा केंद्र ठरला.     
खरेदीचा अंतिम टप्पा 
 गणेशोत्सवापासून विविध कंपन्यांच्या सवलतीच्या योजना सुरू होतात. या योजनांचा अंतिम टप्पा म्हणजे दिवाळी सणांच्या काळात प्रत्येकवेळी यापेक्षा चांगली ऑफर पुढे येईल, या उद्देशाने  अनेकवेळा खरेदी पुढे ढकलली जाते. परंतु दिवाळी हा वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे  सर्व कंपन्यांच्या घसघशीत सूट देणा:या ऑफर्स  असल्याने अनेकजण दिवाळीला सर्वच वस्तूंची खरेदी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.     या व्यतिरिक्त सजावटीची खरेदी, पूजेचे साहित्य, कॉस्मेटीक, पादत्राणे व इतर वस्तूंमध्ये 5 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला.     
फटाके विक्री निम्म्यावर
यंदा फटाके बाजारात कमालीची मंदी होती. शहरात दरवर्षी फटाक्याची विक्री ही 20 कोटीच्याजवळपास असते, यंदा ही 10 कोटीच्या घरात होती. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व सरकारच्या निर्णयामुळे उलाढाल निम्म्यावर आली आहे.

यंदा सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद राहिला. विशेषत: सर्व मुहूर्त स्वतंत्र दिवशी आल्याने दिवाळीच्या दिवसामध्ये दररोज खरेदीसाठी गर्दी होती. माहेरवासीणी येणार असल्याने अजून किमान आठवडाभर गर्दी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.   
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स.    

 दुचाकी खरेदीला यंदा मोठा प्रतिसाद राहिला. दिवाळीच्या सहाही दिवसामध्ये जवळपास एक हजार दुचाकींची विक्री झाली.   
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक, राम होंडा.     

इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत फ्रीड, वाशिंग मशिनला जास्त मागणी होती. त्या खालोखाल एलईडीला मागणी होती.   
- दिनेश पाटील, संचालक, श्री इलेक्ट्रॉनिक्स. 

Web Title: The purchase of Diwali 160 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.