कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:46 PM2020-05-03T13:46:00+5:302020-05-03T13:52:08+5:30

सीसीआय कापूस केंद्रावर सोमवार, दि.४ मेपासून कापूस खरेदी प्रारंभ होत आहे.

Purchase of Kuhe (leaf) at CCI Cotton Shopping Center from Monday | कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी

कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी

Next
ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाजिल्हाधिकाऱ्यांनी जिनिंगचालकास दिली होती नोटीस

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे ) येथील सुशीला जिनिंगमधील सीसीआय कापूस केंद्रावर सोमवार, दि.४ मेपासून कापूस खरेदी प्रारंभ होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ४०० ते ५०० ते शेतकºयांनी नंबर लावले आहेत. मात्र कापूस खरेदीस प्रारंभ होत असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे जिनिंग मालकाला जिल्हाधिकाºयांनी नोटीस बजावली होती. तरीही जिनिंग मालक मजूर मिळत नसल्याचे रडगाणे गात होते. कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याची तक्रार जिनिंगमालकांची होती, तर पावसाळा अवघ्या दीड महिन्यावर आला असतानाही तब्बल ४० टक्के शेतकºयांच्या घरात कापूस असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे जिनिंग सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना शासनाच्या व जिल्हाधिकाºयांच्या जिनिंग मालकांना होत्या. सीसीआय केंद्राच्या अधिकाºयांची खरेदी करण्यास कोणतीही तक्रार नव्हती. केवळ जिनिंग मालकांमुळे खरेदी बंद होती. मात्र ४ मे पासून खरेदी केंद्र सुरू होणार असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्या आठवड्यात प्रायोगिक तत्वावर
दरम्यान, ४ पासून खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र मजूर व जिनिंग-प्रेसिंगची लाईन बसेपर्यंत पहिल्या आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकºयांंना टोकन देण्यात येणार आहे, तर सोमवार, ११ मे पासून सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज टोकण देण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदीस वेग येणार आहे.

Web Title: Purchase of Kuhe (leaf) at CCI Cotton Shopping Center from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.