राजकारण शुद्धीकरणासाठी भडगावात भक्तांनी काढली निर्धार रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 09:42 PM2019-02-01T21:42:25+5:302019-02-01T21:45:47+5:30
जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली काढण्यात आली.
भडगाव, जि.जळगाव : जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली गुरुवारी काढण्यात आली.
रॅलीनंतर लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात निर्धार सभा घेण्यात आली. या वेळी श्री ब्रह्मचारी स्वामी महाहंसजी महाराज, ब्रह्मचारी स्वामी देवगोपालजी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवारातील स्वामी रामानंदजी महाराज, नागेश्वरानंद महाराज, अविरमुक्तेश्वर महाराज त्याचबरोबर चाळीसगाव, जळगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, यावल , सोयगाव , भुसावळ, तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह भाविक उपस्थित होते.
जळगावमध्ये सागर पार्क येथे ५ फेब्रुवारी रोजी रोजी निर्धार सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज तसेच प्रसिद्ध खंजिरी वादक ह.भ.प.सत्यपाल महाराज, श्री ब्रम्हचारी जनार्दनजी महाराज, संत श्री ब्रह्मचारी स्वामी महाहंसजी महाराज, ब्रह्मचारी श्री देवगोपालजी शास्री महाराज यांच्यासह अनेक नामवंत महाराज मंडळी उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉगणेश अहिरे, संगीता विजयकुमार अहिरे, अरूण महाजन, अनिल पाटील, बद्रिनाथ राजपूत, अमरसिंह पाटील, संजय पाटील, कमलाकर पाटील यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.