यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीना सव्वादोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:34 PM2019-05-20T21:34:27+5:302019-05-20T21:38:06+5:30
३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
यावल, जि.जळगाव : ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व सहा. कार्यक्रम के.ए.मोरे यांनी दिली.
ही वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी, गावठाण यासह पडीक जमिनीवर करायची आहे. ग्रामपंचायतींना सामाजिक वनिकरण विभागाकडून रोपे पुरविली जातील.
सामाजिक वनिकरण विभागाच्या लागवड अधिकारी प्रज्ञा वडमारे यांनी सांगितले की, सामाजिक वनिकरणकडून दोन लाख १४ हजार ४०० रोपे पुरविण्यात येणार आहेत.
रोपवाटिकेत उपलब्ध असलेली रोपे- बांबू ४१ हजार ८००, शिसे ५५ हजार २००, आवळा १९ हजार ८००, खैर सहा हजार ५००, निंब एक हजार, फापडा एक हजार ६००, शिवण दोन हजार २०० अशी एकूण १ लाख ५० हजार वृक्षांची रोपे उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीची सुमारे ६० हजार लहान रोपे शिल्लक आहेत. तसेच विरावली व अन्य एका ठिकाणच्या रोपवाटिकेतही रोपे आहेत. त्यात गुलमोहर, सोनमोहर, आवळा, निम, सीताफळ, अंजन, जांभुळ, बदाम, काशीद, सिसम, रेन्द्री या रोपांचा समावेश आहे. सामाजिक वनीकरणच्या या रोपवाटीकेत कार्यरत वरिष्ठ असलेले वनपाल डी.बी. तडवी, वनपाल अशोक पाटील यांच्यासोबतच वनमजूर जी.बी. बाविस्कर, एम.एस. सावकारे, एस.एन. पिंजारी उच्च तापमानातही रोपांचे संगोपन करीत आहेत.