पर्स हरवली अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:19 PM2018-03-27T13:19:36+5:302018-03-27T13:19:36+5:30

पर्स डोक्याशी आणि सुटकेस पायाशी ठेवून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला

The purse is lost and ... | पर्स हरवली अन्...

पर्स हरवली अन्...

Next

गेल्या महिन्यात रोटरी कॉन्फरन्सच्या निमित्ताने नागपूर येथे जाणे झाले. तशी मला पर्स वापरायची सवय नाही; पण बाहेरगावी जायचं म्हटल्यावर पर्स ही आलीच. नागपूरला जाताना सर्व मेंबर्स बरोबर होते आणि कॉन्फरन्सच्या ठिकाणीही सर्व मेंबर्स असल्यामुळे पर्स सांभाळणे सहज शक्य झाले. कारण कुणीतरी पटकन म्हणायचे, ‘मॅडम, पर्स राहिली ना! त्यामुळे दोन दिवस व्यवस्थित पार पडले. पण, येताना मात्र माझ्या रेल्वेच्या डब्यात मी एकटीच होते.
बाकी सर्व सभासद दुसऱ्या दिवशी येणार होते आणि दुस-या रोटरी क्लबचे सभासद वेगवेगळ्या डब्यात होते. त्यामुळे एकटी असल्याचे टेन्शन होते. झोप लागत नव्हती. पर्स डोक्याशी आणि सुटकेस पायाशी ठेवून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातच थोडासा डोळा लागला आणि टी.सी.ने जळगाव आलं म्हणून उठवलं. सुटकेस घेतली आणि दार कसं उघडावं, अजून कोणी असेल का? म्हणून दाराकडे निघाले. तेवढ्यात पुढच्या डब्यातून मेंबर्सनी हात दिला इकडे या म्हणून आणि हायसं वाटून मी चालायला लागले. ‘या गडबडीत पर्स सिटवरच राहिली; पण उतरण्याच्या धांदलीत लक्षात आलेच नाही. खाली उतरलो. सर्व जण जिन्याकडे चालू लागलो आणि गाडी पुढच्या स्टेशनकडे निघाली. लक्षात आले की पर्स नाही. स्टेशनवर सर्वत्र नजर फिरवली. गर्दी नव्हतीच. त्यामुळे कुठे पर्स दिसलीच नाही आणि लक्षात आले आपण डब्यातच पर्स विसरलो. लगेचच सगळ्यांनी आपापल्या रोटरी मित्रांना फोन सुरू केले. तेव्हा लक्षात आले डब्यात चाळीसगावचे रोटरी सभासद होतेच. लगेच त्यांना फोन लावला. सीट नंबर व पर्सचे वर्णन दिले आणि ताब्यात घेण्याची विनंती केली. त्याचवेळी माझ्या डब्यात माझे लांबचे नातेवाईक होते. त्यांनी मला ओळखले होतेच. त्यांनी ती पर्स आधीच ताब्यात घेतली होती. मला फोन केला. मी त्यांना सांगितले, चाळीसगावचे रोटरी सभासद येतील, त्यांना पर्स द्या. म्हणजे सकाळी कुणाही अप-डाऊन करणाºयाबरोबर ती जळगावला परत येईल. खरोखरच ८.३० वाजता पर्स माझ्या हातात होती आणि जीव भांड्यात पडला. पर्स मिळाल्यावर शांतपणे विचार मनात आला की हे सर्व घडले ते रोटरीच्या सभासदांमुळे तसेच मोबाइल असल्यामुळे. दरम्यान, पर्स मिळाली नाही तर विचार मनात आला आपले सर्व कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, एमएमसी सर्वच पर्समध्ये आहेत. हे सर्व परत मिळविणे महाकर्मकठीण आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे बेडरूमची किल्ली. कुणाला बोलवावं लागेल आणि केव्हा कुलूप उघडेल तो एक ‘राम जाने या खुदा जाने’. मै तो बस पर्स हाथ में लेकर सोचती ही रही की सच उपरवाला कितना अच्छा और कृपालू है। ४.३० बजे पर्स गुम है और ८.३० बजे वापर मेरे पास है....
- डॉ.सुमन लोढा

Web Title: The purse is lost and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव