पारोळ्यात लक्झरी चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:03 PM2019-05-30T18:03:28+5:302019-05-30T18:04:20+5:30
कजगाव चौफुलीवरील घटना
Next
पारोळा : येथील कजगाव चौफुलीवर चार तरुणांनानी लक्झरी बस अडवून चालकास मारहाण केली व त्याचा ताब्यातील पैसे, मोबाईल चोरून घेतल्याची घटना घडली
भुसावळ येथून सुरत जाणारी लक्झरी बस जीजे ०५ एक्स ९८७० हिच्या वरील चालक सोहेल खान सलीम खान व भैय्या मोरे यांच्यात दि २८ रोजी तिकिटांच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. २९ रोजी रात्री भैय्या मोरे, सलमान शेख, सामिल शेख व दोन जणांनी चालक सोहेल खान सलीम खान यास मारहाण करीत मोबाईल व वीस हजार रुपये रोख लंपास केले. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.