पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला जळगावात थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:48 PM2017-09-17T12:48:05+5:302017-09-17T12:51:29+5:30

15 सघांचा सहभाग : पहिल्याच दिवशी सादर चार एकांकिकांनी जिंकले मन

Purushottam Trophy starts in Jalgaon | पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला जळगावात थाटात प्रारंभ

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला जळगावात थाटात प्रारंभ

Next
ठळक मुद्देकेसीईचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण‘मानस’, ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही‘, ने जिंकली मने पुढील वर्षी स्पर्धेसाठी बंदीस्त नाटय़ उपलब्ध व्हावे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17  -  महाराष्ट्र कलोपासक (पुणे) आणि केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाटय़शास्त्र विभागातर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला शनिवारी घंटानादाने थाटात सुरुवात झाली. भैयासाहेब गंधे सभागृहात आयोजित या स्पर्धेमध्ये पहिल्याच सादर करण्यात आलेल्या चार एकांकिकांनी उपस्थितांची दाद मिळवित मने जिंकली. 
या उद्घाटन सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे सहसचिव किरण बेंडाळे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, कलोपासक पुणेचे राजेंद्र नागरे, परीक्षक श्रीपाद देशपांडे, अजय धवने, गिरीष केमकर, संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर, चारूदत्त गोखले उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्‍जवालन, नटराज पूजन करण्यात येऊन जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते घंटानाद करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. 
प्रस्ताविक प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले. यामध्ये त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाची महाराष्ट्र कलोपासकने संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानले. तसेच विद्याथ्र्यानी शिस्तबध्दपणे कला सादर करावी, असे आवाहन केले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा कलावंतासाठी व्यासपीठ
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्याथ्र्यामधील कलावंताला साद घालण्याचे काम पुरूषोत्तम करंडक स्पर्धा करते. या स्पर्धेने नवोदीत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले असून यातून घडलेले अनेक कलावंत आज चित्रपटसृष्टीत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. महाविद्यालयीन जीवनात नाटय़ स्पर्धांमध्ये भाग व प्रोत्साहन देण्याचे काम करण्यासह यातील एकही स्पर्धा सोडली नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. ही स्पर्धा प्रतिष्ठेची असून यात युवकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.

 पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची सर्वांना उत्सुकता
मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच सांगितले की, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची सर्वच महाविद्यालयांना उत्सुकता असते, इतके वलय या स्पर्धेने निर्माण केले आहे. महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थी किरण बेंडाळे यांचा सारखा रंगकर्मी नसला तरी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासारखा रसिक असून त्याला या स्पर्धेची उत्सुकता असते, असाही उल्लेख त्यांनी केला. मी मू.जे. महाविद्यालयाचाच विद्यार्थी असून 1985मध्ये मू.जे. महाविद्यालयाची ‘बाळू जोशीला काय वाटते ?’ ही एकांकिका विजेती ठरली त्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला व दुस:या दिवसाचा जल्लोष आजही लक्षात असल्याचा उल्लेख करून या स्पर्धेचे वलय किती असते, हे स्पष्ट केले. जळगावात स्पर्धेचे केंद्र बंद पडते की काय अशी भीती असताना पुरुषोत्तक करंडक स्पर्धेची परंपरा खंडित न होऊ देता मू.जे. महाविद्यालयाने त्याची घौडदौड कायम ठेवली, याबद्दल आनंद व्यक्त केला. मुंबई, पुण्यात  न जाता आता येथेच केसीई संस्था सर्व शिक्षण उपलब्ध करून देत असून येथून तयार झालेले विद्यार्थी मुंबई-पुण्यात पोहचले असल्याचेही गौरोद्गार त्यांनी काढले. याच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदार्पयत पोहचल्याचेही त्यांनी आवजरून सांगितले. 

पुढील वर्षी स्पर्धेसाठी बंदीस्त नाटय़ उपलब्ध व्हावे
यंदा या ठिकाणी ही स्पर्धा होत असली तरी शहरात प्रगतीपथावर  असलेल्या अद्यायावत बंदीस्त नाटय़गृहात ही स्पर्धा व्हावी व त्यासाठी ते पुढील वर्षार्पयत खुले व्हावे, अशी विनंती मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्हाधिका:यांनी केली. 

शिक्षणासोबत व्यक्तीमत्त्वाच्या विकासाकरीता विविध उपक्रम
किरण बेंडाळे म्हणाले की, मूळजी जेठा महाविद्यालय हे विदयाथ्र्यांना केवळ शैक्षणिक सुविधा देत नाही तर त्यासोबत त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासाकरीता विविध उपक्रम राबवित आहे. जलश्री, विविधता संशोधन केंद्र, एकलव्य क्रीडा संकूल या विभागाद्वारे राबविण्यात येणा:या उल्लेखनीय उपक्रमाचीदेखील त्यांनी माहिती दिली. 
राजेंद्र नांगरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांमध्ये केवळ केसीई संस्थेनेच स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केल्याचे नमूद करीत कलोपासकच्या  हाकेला केसीईने मान दिल्याबद्दल आभार मानले.
सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी करून आभार मानले. स्पर्धा आयोजनासाठी शशिकांत वडोदकर, नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील,  प्रा.जुगलकिशोर दुबे, प्रा.विश्वजित चौधरी, प्रा.कपील शिंगाणे, प्रा.प्रसाद देसाई, प्रा.स्वप्ना लिंबेकर, प्रा.योगेश महाले, डी.डी.झोपे, प्रा.विजय लोहार, प्रा.अविनाश काटे, राकेश वाणी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या परिश्रम घेत आहे.
 
केसीईचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने 16 सप्टेंबर रोजी 75व्या वर्षात पदार्पण केले.  याचे औचित्य साधत या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगावच्या नाटयगृहाचे 1 जानेवारीला लोकार्पण
पुढील वर्षीर्ही स्पर्धा अद्ययावत बंदीस्त नाटय़गृहात  व्हावी अशी विनंती मिलिंद कुलकर्णी यांनी केल्यानंतर किरण बेंडाळे यांनीदेखील आपल्या भाषणात याचा धागा पकडत तसा उल्लेख केला. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 1 जानेवारी 2018 रोजी त्याचे लोकार्पण होईल, अशी घोषणा  केली. 

‘मानस’, ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही‘, ने जिंकली मने 
पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एंकाकिका स्पर्धेत पहिल्या  दिवशी सादर झालेल्या ‘मानस’ , ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही’ या एंकाकिकांनी रसिकांची मने जिंकली.  

‘मानस’मधून मानसिक आजारी तरुणाच्या व्यथेचे दर्शन
 गोदावरी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च तर्फे सादर मानस या रहस्यमय एकांकिकेत मानसिक आजारी असलेल्या  तरुणाची व्यथा मांडण्यात आली असून मानस (आकाश शर्मा) त्याची प}ी स्वप्नाली हिला (अेषा गायकवाड) काहीतरी भास होतात, अशा समजातून मानसोपचार तज्ज्ञाकडे  उपचारासाठी नेतो. पूर्ण एकांकिका मानस, स्वप्नाली, डॉक्टर या तिघांभोवती फिरते.  ऋषिकेश तुरई लिखित ‘मानस’ या एकांकि केचे आकाश शर्मा यांनी  दिग्दर्शन केले आहे.

‘स्टॅच्यु’द्वारे मानवतेचा शोध
आयएमआर महाविद्यालयाच्या स्टॅच्यु  या एकांकिकेत समाजातील स्त्री अत्याचार, पुतळयांच्या कोनशिलेची चोरी,  पुतळयांची दुरूस्ती तसेच विविध घडामोडीवर भाष्य करण्यात आले आहे. अंधारात भरकटलेल्या जगात मानवतेचा शोध घेणारी माई (शिवानी भावसार)ची भूमिका रसिकांना आवडली. एकांकिकेत पांढरा (गौरव पटेल), स्टोनी वेलकम (सचिन महाजन), सिल्व्हर (केतन देशमुख), आकाश सोनवणे, विवेक रूळे, चेतन पाटील, पारस सोनवणे यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन केतन देशमुख यांनी केले असून लेखन समीर तडवी यांचे आहे.

‘च्या बही’ने पटविले मातृभाषेचे महत्त्व 
डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातर्फे सादर ‘च्या बही’ एकांकिकेत मातृभाषेचे महत्त्व विशद करण्यात आले असून यात 10 विनोदी कलावंतांनी (जोकर) इंग्रजी भाषेचा उदो-उदो कसा चालतो हे दाखविले आहे. देशातील भाषांना कशा पध्दतीने दुय्यम दर्जा आपणच देतो याचे चित्र कलावंत विद्यार्थिनींनी उभे केले आहे. सपना बाविस्कर, आरती गोळीवाले, प्रियंका वाणी,  हर्षदा पाटील, प्रणाली माळी, चंद्रकला शिंदे, विशाखा चव्हाण, जयश्री पाटील, राजश्री खडके, अंकिता सोनार यांच्या भूमिका आहेत. लेखिका प्रणाली माळी असून दिग्दर्शिका आरती गोळीवाले आहेत. 

आज  सादर होणा:याएकांकिका
17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळची ‘पुरुष’, समाजकार्य विभाग, उमविची ‘कॅफे शुभमंगल’, एम.डी. पालेशा कॉमर्स कॉलेज, धुळेची ‘ब्रेकअप के बाद’ या एकांकिका सादर होणार आहे. दुपारच्या व संध्याकाळच्या सत्रात 2 ते 7 या वेळेत देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘कबूल है’, नाहटा महाविद्यालय, भुसावळची ‘एक्स’, प्रताप महाविद्यालय, अमळनेरची ‘रावीपार’, नॉलेज सिटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरीची ‘उंच माझा झोका गं..’,  शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळेची ‘पंचावन्न आणि साठीतले प्यादे’ या एकांकिकांची मेजवानी रसिकांना पाहायला मिळणार आहे.  रसिक, विद्यार्थी, शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्पर्धेच्या स्वागत समितीने केले आहे.

Web Title: Purushottam Trophy starts in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.