वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:46+5:302021-07-21T04:13:46+5:30

यावल : घरगुती वीज बिलाची उर्वरित रक्कम भरणा करा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडले जाईल, अशी सूचना देण्यासाठी ...

Pushing and beating of power workers | वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण

वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण

Next

यावल : घरगुती वीज बिलाची उर्वरित रक्कम भरणा करा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडले जाईल, अशी सूचना देण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील विरारनगर परिसरात २० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून सेवेत कार्यरत असलेले योगेश सुधाकर करणकर व सहकारी किरण रोहिदास बागुल यांच्यासोबत वीजवसुलीच्या थकबाकीसाठी गेले होते. तेव्हा वीज वापरकर्ते ग्राहक रफिक, फरदीन, मुन्ना व एक महिला यांनी योगेश करणकर हे उर्वरित वीज बिलाची रक्कम ११४१ रुपये अशी भरणा करण्याची सूचना देत होते. तेव्हा घरातील महिलेने हातातील पाणी भरण्याच्या नळीने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्या ठिकाणी उपस्थित रफिक, फरदीन, मुन्ना पूर्ण नाव माहीत नाही यांनी कर्मचारी योगेश करणकर यांची कॉलर पकडून ओढाताण करून शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यासंदर्भात योगेश करणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Pushing and beating of power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.