जळगावात धक्का मारून विवाहितेच्या हातातील मोबाईल लांबविला

By admin | Published: July 12, 2017 12:15 PM2017-07-12T12:15:08+5:302017-07-12T12:15:08+5:30

दुपारी शाळेतून स्कूल बसने घरी येण्याची वेळ झाल्याने सोनाली पाटील या मोहन नगरात रस्त्यावर तिची प्रतीक्षा करीत होत्या.

Pushing in Jalgaon, the marriage was delayed by the marriage | जळगावात धक्का मारून विवाहितेच्या हातातील मोबाईल लांबविला

जळगावात धक्का मारून विवाहितेच्या हातातील मोबाईल लांबविला

Next
नलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - शाळेतून येणाºया मुलीची वाट पाहत असलेल्या सोनाली मनोज पाटील (रा.मोहन नगर, जळगाव) या विवाहितेला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धक्का मारुन त्यांच्या हातातील ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना मंगळवारी भर दुपारी साडे तीन वाजता मोहन नगरात घडली.सोनाली पाटील यांची मुलगी वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी या शाळेत शिक्षण घेत आहे. दुपारी शाळेतून स्कूल बसने घरी येण्याची वेळ झाल्याने सोनाली पाटील या मोहन नगरात रस्त्यावर तिची प्रतीक्षा करीत होत्या. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळून पायी चालत गेला. त्यानंतर थोड्याच वेळाने तो एका दुचाकीवर त्याच्या सहकाºयासह आला व सोनाली पाटील यांना धक्का देत त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन पसार झाला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीवरुन जात असताना ‘मोबाईल घेतला...मोबाईल घेतला..’ असे तो ओरडावून सांगत होता. सोनाली पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र उपयोग झाला नाही. दुपारच्या वेळी या रस्त्यावर फारसी रहदारी राहत नसल्याने त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. दरम्यान, चोरटे शहरातीलच असल्याचा संशय असून परिसरात कुठे सीसीटीव्ही फुटेज आहेत, का याची तपासणी पोलीस करीत आहेत.पोलिसांनाही अपयशमोबाईल पळविल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिल्यानंतर दोन कर्मचाºयांनी चोरटे ज्या मार्गाने गेले त्या मार्गावर त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांच्याही पदरी निराशा पडली. लाल रंगाची व विना क्रमांच्या दुचाकीवरुन दोघं जण आले होते. ते २५ ते ३५ वयोगटातील असावेत असा अंदाज आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.

Web Title: Pushing in Jalgaon, the marriage was delayed by the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.