भुसावळात पुष्पक एक्सप्रेसमध्ये अवतरली ‘पुष्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:08 AM2019-05-20T00:08:10+5:302019-05-20T00:09:29+5:30

मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले.

Pushpa Express in Bhushan | भुसावळात पुष्पक एक्सप्रेसमध्ये अवतरली ‘पुष्पा’

भुसावळात पुष्पक एक्सप्रेसमध्ये अवतरली ‘पुष्पा’

Next
ठळक मुद्देरेल्वे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली सुखरुप प्रसूतीगाडीतील सहप्रवाशांनी केला जल्लोषमुलीचे नाव ठेवण्याचे सुचविले पुष्पा

भुसावळ, जि.जळगाव : मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले.
मुंबईवरून लखनऊकडे जाणाºया गाडी क्रमांक १२५३४ पुष्पक एक्सप्रेसच्या सामान्य (महिला) डब्यामध्ये दुपारी साडेतीनला अलीना देवी (३५) ही महिला एकटीच लखनऊसाठी प्रवास करत होती. गरोदर असूनही व लखनऊला जाणेही आवश्यक असल्यामुळे अलिनादेवी अशा स्थितीमध्ये महिला डब्यामध्ये प्रवास करत होत्या. भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटांपूर्वी अलिनादेवी यांना अति तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या. याची माहिती रेल्वे हॉस्पिटलचे डॉ.रविराज तेजा यांना कळविण्यात आली. तेजा यांनी क्षणाचाही विलंब न करता पुष्पक एक्सप्रेससाठी फलाट नंबर ३ गाठून या महिलेचा शोध घेतला. ही महिला डब्याय वेदनेने व्याकुळत होती. डॉ.तेजा व नर्स डोंगरदिवे यांच्या सहाय्याने मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के.सावंत राय व सहाय्यक चिकित्सा अधीक्षक डॉ.श्रवण कुमार यांच्या सहकार्याने महिलेची प्रसूती सुखरूप झाली. महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले व डब्यांमध्ये सर्वांनी सुटकेसाठी श्वास घेतला व कन्यारत्न प्राप्त झाल्याने जल्लोषही केला. पुष्पक गाडीमध्ये कन्यारत्न प्राप्त झाल्याने ही मुलगी भविष्यामध्ये पुष्पक गाडीप्रमाणेच धावेल. मुलीचे नाव पुष्पा ठेवा, असा आग्रह सहप्रवाशांनी केला व गोंडस मुलीचे नाव पुष्पा ठेवण्यात आले. अशा पद्धतीने ‘पुष्पक’मध्ये अवतरली. पुष्पा या एकाच घटनेची चर्चा दिवसभर रेल्वेस्थानकावर केली जात होती.
दरम्यान, अलिना देवी व पुष्पाची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Pushpa Express in Bhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.