अंतर्नादतर्फे आजपासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:13 PM2020-12-15T17:13:09+5:302020-12-15T17:15:09+5:30

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरसुध्दा रसिक या प्रबोधनमालेचा लाइव्ह लाभ घेऊ शकणार आहेत. 

Pushpanjali Online Prabodhanmala by Antarnad from today | अंतर्नादतर्फे आजपासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला

अंतर्नादतर्फे आजपासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला

Next
ठळक मुद्देप्रथमपुष्प पुण्याचे कवी देवा झिंजाड गुंफणारअंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरसुध्दा रसिक या प्रबोधनमालेचा लाइव्ह लाभ घेऊ शकणार

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानची फिरती पुष्पांजली प्रबाेधनमाला म्हणजे भुसावळची वैचारीक विश्व व्यापक करणारी चळवळ. यंदा तिचं तिसरं वर्ष. काेराेनाचा काळ असल्याने यंदा ही प्रबोधनमाला १५, १७ व १९ डिसेंबर असे तीन दिवस ऑनलाईन हाेईल. झूम अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत ही प्रबोधनमाला पोहचवण्यात येणार आहे. अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरसुध्दा रसिक या प्रबोधनमालेचा लाइव्ह लाभ घेऊ शकणार आहेत. 
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील यांच्या माताेश्री पुष्पा पाटील यांच्या स्मरणार्थ वैचारिक चर्चेचं दालन या अभिनव अशा उपक्रमाच्या माध्यमातून उघडलं आहे. उपक्रमासाठी जळगाव येथील कलारसिक अजय बढे यांचे सहकार्य लाभत आहे. नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, संजय भटकर, योगेश इंगळे, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, सुनील वानखेडे, विक्रांत चौधरी, देव सरकटे, शैलेंद्र महाजन, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, राजू वारके, जीवन सपकाळे, हरीष भट, प्रमोद पाटील, भूषण झोपे, ईश्वर पवार, सचिन पाटील, संदीप सपकाळे, मंगेश भावे, प्रा.भाग्यश्री भंगाळे, वंदना भिरूड यांचा समावेश आहे. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक प्रा.श्याम दुसाने, सहसमन्वयक आर.डी. सोनवणे यांनी केले आहे.
प्रथम पुष्प : १५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता होईल. वक्ते : देवा झिंजाड, पुणे (विषय : माय-बापाच्या कविता), द्वितीय पुष्प  १७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता (वक्ते : जीवन महाजन, भुसावळ, विषय : संकटे गिळताे बाप माझा), तृतीय पुष्प १९ डिसेंबरला सायंकाळी ६.०० वाजता (वक्ते : उज्ज्वला सुधीर माेरे, वाशिम, विषय : मुकी घरे बाेलकी करू या)
 

Web Title: Pushpanjali Online Prabodhanmala by Antarnad from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.