आरोग्य यंत्रणेला कामाला लावा,अन्यथा सेवानिवृत्ती घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:39+5:302021-09-25T04:16:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात डेंग्यू , मलेरिया अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, शहरात डेंग्यू प्रादुर्भाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात डेंग्यू , मलेरिया अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, शहरात डेंग्यू प्रादुर्भाव वाढण्यास मनपा प्रशासन जबाबदार आहे. मनपा आयुक्तांनी मनपाच्या आरोग्य यंत्रणेला तत्काळ कामाला लावून, डेंग्यूवर नियंत्रण मिळवावे अन्यथा सेवानिवृत्ती घेवून जळगावकरांना मोकळे करावे असा सल्ला राष्ट्रवादी कॉग्रेस अर्बन सेल पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मनपा प्रशासनाने नियोजन न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीकडून शुक्रवारी देण्यात आला आहे.
यावेळी अर्बन सेल जिल्हाध्यक्षा अश्विनी विनोद देशमुख, मनोज वाणी,मुविकोराज कोल्हे,माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राजू मोरे, जितेंद्र चांगरे, मंगला पाटील, किरण राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न बिकट झाला असून, सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून शहरातील स्वच्छतेकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मनपातील कोणताही अधिकारी शहरातील स्वच्छतेबाबत लक्ष देत नसून, सर्व अधिकारी वॉटरग्रेसकडूनच वेतन घेतात का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या आहेत मागण्या
१. मनपाने साफसफाई काटेकोरपणे दैनंदिन होते आहे की नाही ? याची खात्री वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
२. शहरात प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीत धुर फवारणी होणे गरजेचे आहे. तसेच डेंग्यू, मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
३. वॉटरग्रेस कडून जर शहरातील स्वच्छतेचे काम होत नसेल, कंपनीला पैसे करत काम बंद करा असेही निवेदनात म्हटले आहे.