सेवानिवृत्त शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

By admin | Published: April 8, 2017 01:00 AM2017-04-08T01:00:46+5:302017-04-08T01:00:46+5:30

रामानंदनगरनजीकची घटना : पत्ता विचारण्याचा केला बहाणा

Putting the gold vessel of retired teacher | सेवानिवृत्त शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

सेवानिवृत्त शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

Next

जळगाव : शहरातील रामानंदनगर परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिक्षिकेची गळ्यातील अडीच तोळ्याची 54 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत ओढून नेल्याची घटना सकाळी 10़10 वाजता घडली़ वृध्देने चोरटय़ाला टाळल़े तरीही गेट बंद करून घरात जाण्यासाठी फिरताच चोरटय़ाने गेटमधून हात घालून पोत ओढून दुचाकीवरून पोबारा केला़
रामानंदपरिसरातील चंद्रमा अपार्टमेंटसमोर सेवानिवृत्त शिक्षिका विजया नारायण कदम या वास्तव्यास आहेत़ 15 वर्षापूर्वी त्या मु़ज़ेमहाविद्यालयत परिसरातील भोईटे शाळेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत़
कार्डवरील पत्ता विचारला
सकाळी त्यांच्या कॉलनीत लोटगाडीवरील भाजीपाला विक्रेता आला होता़ त्याच्याकडून कदम यांनी भाजीपाला घेतला व घरात जाण्यासाठी परतल्या़ इतक्यात एक तरूण आला़
त्याने व्हीजिटींग कार्ड दाखविले व त्यावरील इंग्रजी भाषेतील पत्ता विचारला़ कदम यांनी त्याला               इंग्रजी वाचता येत नसल्याचे सांगून टाळल़े
 पुढे कोणाला तरी विचारा असे सांगितल़े गेटबंदकरून कदम यांनी घराकडे पाठ फिरविताच                  चोरटय़ाने गेटमधून त्यांना                              काही कळण्याच्या आत गळ्यातील पोत लांबवली व दुचाकीवरून                  पोबारा केला़
12 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथूनपोत बनवून             घेतली होती, असे या महिलेकडून समजले.

दुचाकीवरून आले      दोघे चोरटे
काळ्या रंगाची दुचाकीवरून दोघे आल़े दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेट घातले होत़े मागील तरूणाने हेल्मेट घातले नव्हत़े तो गाडीखाली उतरला व त्याने पत्ता विचारण्याचा बहाणा केला़ तोर्पयत दुचाकीसुरू होती़ पोत ओरबाळताच दोघे दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाल़े     कदम यांनी पोत गेली़़़पोत गेली़़़अशी आरडाओरड केली़ शेजारील अपार्टमेंटमधील तरूण बाहेरही आल़े मात्र तोर्पयत दोघे दिसेनासे झाल़े घटनेनंतर कॉलनीतील नागरिकांसह       कदम यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली़ घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश घोळवे करीत आहेत़

Web Title: Putting the gold vessel of retired teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.