प.वि.पाटील व ए.टी.झांबरे विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:08+5:302021-04-15T04:15:08+5:30
================ बहिणाबाई विद्यालय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहिणाबाई प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ...
================
बहिणाबाई विद्यालय
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहिणाबाई प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे, सचिव जनार्दन रोटे, मुख्याध्यापक टी.एस.चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापक राम महाजन व शिक्षक उपस्थित होते. सुरुवातीला बंडू काळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा खडके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी प्रतिभा राणे, सिमा चौधरी, स्वाती कोल्हे, डॉ.विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, विशाल पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदिश नेहते आदी उपस्थित होते.
===============
जिजामाता विद्यालयात
हरिविठ्ठल नगरातील न्यू जागृती मित्रमंडळ संचलित जिजामाता विद्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आर. खोरखेडे यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी शिक्षक किशोर पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले.
==============
संस्कृती माध्यमिक विद्यालय
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. अश्विनी फालक यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली, तसेच डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या जयंतीनिमित्त शाळेकडून ऑनलाइन पद्धतीने निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदविला होता.
==============
शिक्षणशास्त्र व शारीरिकशास्त्र महाविद्यालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रा.ए.आर राणे, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.केतन चौधरी, मोहन चौधरी उपस्थित होते.