प.वि. पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एनएसएसई परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:29+5:302021-03-29T04:10:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या एनएसएससी परीक्षेत यश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या एनएसएससी परीक्षेत यश संपादन केले.
इयत्ता पहिली ते चौथीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत आयुष योगेश बारी हा १८८ गुण मिळवून राज्यात प्रथम ठरला आहे. संस्कृती दिनेश पाटील ही १८६ गुण मिळवून द्वितीय तसेच मानवी अरविंद पाटील व उपासना सत्यानंद सिसोदे यांनी १८४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शास्वत विशाल कुलकर्णी हा १७६ गुण मिळवून उत्तेजनार्थ ठरला आहे. त्याचबरोबर मंथन परीक्षेमध्ये केतन पाटील, दिशा पाठक, गुंजन ढाके व श्रेयस पाटील आदींनी यश मिळवून बक्षीस मिळविले. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह तसेच पदक देऊन गौरविण्यात आले.