कच्च्या मालाच्या तुटवड्याने पीव्हीसी पाइपचे दर ७० टक्क्यांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:17+5:302020-12-27T04:12:17+5:30

जळगाव : कोरोनाकाळात कच्चा माल तयार होत नसल्याने व आता अचानक मागणी वाढल्याने पीव्हीसी पाइपच्या कच्च्या मालाचा तुटवडा भासत ...

PVC pipe prices rose by 70 per cent due to shortage of raw materials | कच्च्या मालाच्या तुटवड्याने पीव्हीसी पाइपचे दर ७० टक्क्यांनी वधारले

कच्च्या मालाच्या तुटवड्याने पीव्हीसी पाइपचे दर ७० टक्क्यांनी वधारले

googlenewsNext

जळगाव : कोरोनाकाळात कच्चा माल तयार होत नसल्याने व आता अचानक मागणी वाढल्याने पीव्हीसी पाइपच्या कच्च्या मालाचा तुटवडा भासत असून त्यांच्या भावात तब्बल चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. परिणामी पाइपाचेही भाव वाढून शेतकऱ्यांचे गणित कोलमडत आहे.

जळगावातील पाइप उद्योग मोठा असून येथून देश-विदेशात पाइपाची निर्यात होते. त्यामुळे येथे कच्च्या मालाचीदेखील मोठी मागणी असते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाल्याने उद्योग क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही.

कच्चा मालच तयार होईना

कोरोनाच्या काळात व्यापार, उद्योग बंद झाल्याने वेगवेगळ्या घटकांपासून तयार होणारा कच्चा मालही तयार होणे थांबले. यामध्ये पाइपासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मोठा तुटवडा भासत आहे. ज्या उत्पादनापासून कच्चा माल तयार होतो, त्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी नसल्याने कच्चा मालही तयार होण्यावर परिणाम झाला आहे. पाइपासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल तैवान, कोरिया, जपान, अमेरिका, जर्मनी थायलंड या देशांतून आयात होतो. मात्र अजूनही कच्च्या मालाची आवक वाढलेली नाही.

अजून सहा महिने चिंता

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार सुरळीत होण्यासाठी अजून किमान सहा महिने लागणार आहेत. यामुळे स्वाभाविक कच्चा मालही वाढण्यास किमान सहा महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. सध्या तुटवड्यामुळे जो कच्चा माल अगोदर ५८ ते ६० रुपये प्रतिकिलो होता तो आता १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

मागणीच्या काळातच तुटवडा

एरव्ही कमी शेती क्षेत्र असलेले लहान शेतकरी याच दिवसात पाईपाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. याच काळात कच्चा माल येत नसल्याने भाव वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याची झळ बसत आहे.

—————————

सध्या कच्चा मालाचा तुटवडा असल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढेल आहेत. याचा परिणाम पाईपाच्या भावावर होऊन त्यांचे भाव वाढत आहे.

- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, जळगाव पाईप इंडस्ट्री असोसिएशन

Web Title: PVC pipe prices rose by 70 per cent due to shortage of raw materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.