प्रा. अर्चना भोसले यांना पीएच. डी. पदवी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 07:29 PM2020-09-24T19:29:05+5:302020-09-24T19:29:21+5:30
जळगाव : ओम साई शिक्षणशास्र महाविद्यालयाच्या प्रा. अर्चना भोसले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ' शिक्षणशास्र पदविका ...
जळगाव : ओम साई शिक्षणशास्र महाविद्यालयाच्या प्रा. अर्चना भोसले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे 'शिक्षणशास्र पदविका अभ्यासक्रमाचा छात्र अध्यापकांच्या अभ्यास सवयी व अभिवृत्तींवर होणा-या परीणामांचा अभ्यास' या विषयात पीएच. डी. पदवी घोषित करण्यात आली. त्यासाठी मा. अधिष्ठाता डॉ. अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापिठामार्फत अॉनलाइन वेबिनार होवून त्यात अर्चना भोसले यांना पीएच.डी. पदवी घोषित करण्यात आली. त्यांना प्रा. डॉ.नलिनी पाटील, प्राचार्य एस एन डी टी महिला महाविद्यालय,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. मा. कुलसचिव प्रा. डॉ. बी.व्ही.पवार यांनी त्यांचा गौरव केला. तर त्यांच्या यशाबद्दल ओम साई शिक्षणशास्र महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. सुनिल महाजन, सचिव ललित धांडे, जयश्री महाजन यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. साहेबराव भुकन, प्राचार्य डॉ. यादव सनेर , प्रा. डॉ. अविंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. अर्चना भोसले पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी शिवाजी पाटील यांच्या सून असून, विद्यानिकेतन शाळेचे निवृत्त प्राचार्य डॉ.पी. बी. भोसले यांच्या कन्या आहेत.