शाई खराब असल्याने क्वारंटाईने शिक्के गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:57 AM2020-05-05T11:57:27+5:302020-05-05T11:58:06+5:30
जळगाव : जळगाव : सम्राट कॉलनी परिसरातील चाळीस वर्षीय मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर १३ जणांना कवारंटाईन ...
जळगाव : जळगाव : सम्राट कॉलनी परिसरातील चाळीस वर्षीय मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर १३ जणांना कवारंटाईन करण्यात आले. मात्र शाई खराब असल्याने क्वारंटाईनचे शिक्के पुसले गेल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.
सम्राट कॉलनीतील मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना राबवायला सुरूवात केली आहे़ या परिसरातील १३ व्यक्तिंना कवारंटाईन करण्यात आले. या परिसरात सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे़ दरम्यान, प्रशासनाने काही लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले होते़ मात्र, शाई खराब असल्याने हे शिक्केच पुसले गेले असून ही बाबा धोकादायक असल्याची तक्रार परिसरातील काही नागरिकांनी केली आहे़ ही बाब प्रशासनासाठीही डोकेदुखीची ठरू शकते, अशा स्थितीत याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
अमळनेरचा प्रौढही
होणार कोरोनामुक्त
अमळनेर येथील ५४ वर्षीय प्रौढाचे चौदा दिवसानंतर घेतलेल्या नमुन्यांचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे़ पंधराव्या दिवशीचा अहवाल प्रलंबीत असून त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची कोरोनातून सुटका होणार आहे़ कोरानातून बरे होणारे ते तिसरे रुग्ण असतील़ मुंगसे येथील महिलेच्या संपर्कातील डॉक्टांराचा अहवालह निगेटीव्ह आला आहे.