घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Published: February 22, 2017 12:07 AM2017-02-22T00:07:54+5:302017-02-22T00:07:54+5:30

जामनेर : पालिकेच्या सभेत ३५ विषयांवर चर्चा, सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक चकमक

The question of the brood over the anagram again | घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next

जामनेर : येथील पालिकेची सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी  पालिका सभागृहात झाली. या सभेत ३५ विषयांवर चर्चा होऊन तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अपूर्ण अवस्थेत असलेले १३४ घरकुलांचे बांधकाम हा विषय चर्चेस आला असता विरोधी नगरसेवक जावेद मुल्लाजी यांच्यासह आघाडीच्या १०    नगरसेवकांनी हरकत घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक चकमक उडाल्याने ही सभा गाजली.
या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २९४ आयएचएसडीपी योजनेंतर्गत रखडलेले १३४ घरकुलांचे बांधकाम १४ व्या वित्त आयोग निधीतून अथवा पालिका फंडातून करण्यात यावे, असा विषय चर्चेला आला असता विरोधी गटातील नगरसेवक जावेद मुल्लाजी यांनी हरकत घेऊन सांगितले की, शासनाने १० वर्षांपूर्वी १२३८ घरकुलांना मंजुरी दिली असून, कोट्यवधी रुपयांचा निधी वेळोवेळी पालिकेला पुरविला आहे. हा प्रकल्प वेळीच पूर्ण होणे अपेक्षित होते.
या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी सर्व अधिकारी व अभियंते यांच्यावर असताना संबंधितांनी वेळकाढू धोरण अवलंबल्याने हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले असून, अद्याप हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने शासनाचे अडीच कोटी रुपये परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे.
या संपूर्ण प्रकाराला जबाबदार सर्व अधिकाºयांची व अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून केंद्र व राज्य शासनाचा घरकूल बांधकाम हा विषय अव्वल क्रमांकाचा व प्राधान्याचा विषय असून शासनाकडून विविध स्वरूपाचा निधी उपलब्ध करून झोपडपट्टीमुक्त शहर करावे यासाठी १४ वा वित्त आयोग अथवा नपा निधी वापरणे अनुचित ठरेल, असा प्रस्ताव मांडून त्यांनी या ठरावाला विरोध केला. मात्र पीठासीन अधिकाºयांच्या अनुमतीने हा ठराव फेटाळण्यात आला.
विशेष म्हणजे यावर मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही विरोधकांनी केली असता तीही फेटाळण्यात  आली.
नुकतीच राज्य शासनाने अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरकुलांच्या कामासाठी साडेचार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असता तो निधी कुठे खर्च केला, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला. यामुळे
पुन्हा घरकुलांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून आले. आघाडीचे गटनेते अनिल बोहरा यांनी शहरामध्ये सुरू आलेल्या नवीन जलवाहिनीचे काम करत असताना अधिकाºयांनी महिलांना अपशब्द वापरू नये, अशी तंबी दिली. या सर्वसाधारण सभेमध्ये तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहरामध्ये रस्ते डांबरीकरण, खडीकरण, आरसीसी गटार, पेव्हर ब्लॉक, फिरते शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधणे या कामांना मंजुरी देण्यात आली.
या वेळी नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्षा सुनीता भोईटे, नगरसेविका सुनीता नेरकर, कल्पना पाटील, सविता पाटील, नंदा चव्हाण, हसीनाबी मनियार, अख्तरबी गफ्फार, शोभाबाई धुमाळ, शहनाजबी न्याजमोहम्मद, सुनीता बेनाडे, गटनेते महेंद्र बाविस्कर, अनिल बोहरा,    जावेद मुल्लाजी, मुकुंदा सुरवाडे,    उत्तम पवार, छगन झाल्टे, श्रीराम महाजन, इस्माईल खान, सीतेश साठे, पिंटू चिप्पड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३४ घरकुलांच्या प्रश्नावर हरकत घेतली. यात म्हटले आहे की, पालिकेने प्रशासकीय कामकाज शासन निर्देशान्वये निश्चित मुदतीत करून घेणे ही मुख्याधिकाºयांची प्राथमिक जबाबदारी असताना त्यांनी दिरंगाई केली. यामुळे १३४ गरीब, बेघर घरकुलांपासून वंचित राहिले. या दिरंगाईमुळे पालिकेस मिळालेला २ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च न करता शासनास परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. पालिकेस विविध करांपोटी वर्षाला १ कोटी ७७ लाख उत्पन्न मिळते. यातून घरकुलांसाठी कसा खर्च केला जाणार, पालिका निधीतून घरकुलांचे काम करण्याचा हट्ट सत्ताधिकाºयांचा आहे. असे झाल्यास शहरातील इतर विकासकामांसाठी निधी कोठून आणणार हा प्रश्न आहे. हरकत घेणाºयांमध्ये माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, नगरसेवक पिंटू चिप्पड, प्रा.उत्तम पवार, मुकुंदा सुरवाडे, जावेद मुल्लाजी, अनिल बोहरा, उपनगराध्यक्षा सुनीता भोईटे, सुनीता नेरकर, हसीनाबी मन्यार, सविता पाटील यांचा समावेश आहे.
घरकूल उभारणी करताना वेळोवेळी आलेल्या अडचणींमुळे बांधकामाच्या किमतीत वाढ झाली. साडेचार कोटींचा निधी पालिकेकडे असून १४ व्या वित्त आयोगातून या उर्वरित १३४ घरकुलांच्या उभारणीचे काम करणे शक्य आहे. यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदत असून, या कालावधीत काम पूर्ण केले जाईल.
-शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जामनेर
साडेचार कोटींचा निधी घरकूल दुरुस्तीसाठी आलेला असताना अद्यापपावेतो दुरुस्तीचे कामकाज का झाले नाही. वीज , पाणी या प्राथमिक सुविधा पुरविल्या जात नाही. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांची मुस्कटदाबी होत असून स्वीकृत नगरसेवक श्रीराम महाजन हे पालिका चालवतात. पालिकेचा कारभार मनमानीचा सुरू असून आघाडीच्या १० नगरसेवकांची विरोध केला व मतदानाची मागणी केली. मात्र पीठासीन अधिकाºयांनी ती फेटाळली. याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करणार आहे.    
    -सुनीता अशोक नेरकर, नगरसेविका, काँग्रेस आघाडी

Web Title: The question of the brood over the anagram again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.