इंग्रजीमुळे प्रादेशिक भाषा व बोलींच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:12 AM2018-12-31T02:12:58+5:302018-12-31T02:15:18+5:30
इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले.
जामनेर, जि.जळगाव : इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले.
तावडी बोली मराठी साहित्य संमेलन झाले. त्यात संमेलनाध्यक्ष असलेल्या गो.तु.पाटील यांनी मानवी जीवनात भाषेचे महत्त्व यासह विविध मुद्यांना स्पर्श केला. लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. याचा अर्थ प्रत्येकाला आपल्या वा अन्य कोणत्याही भाषेत बोलण्याचा आणि विचार मांडण्याचा हक्क असतो. म्हणूनच आपली बोली जतन करून तिला समृद्ध करण्याची मानसिकता सुसंस्कृत माणसाच्या ठिकाणी असते. सद्य:स्थितीत आपल्या ठिकाणी असलेली आपली भाषा संवर्धनाची मानसिकता अधिक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक काळात झालेल्या आणि अलिकडच्या काळात मराठी साहित्यात होत असलेल्या वापरामुळे अभ्यासकांचे तावडी बोलीकडे लक्ष वेधले. काही लेखक आणि अभ्यासकांच्या प्रयत्नातून वापराबरोबरच लोकजागरही वाढत गेला आहे, याची आठवण गो.तु.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कथन केली.