आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 03:07 PM2020-05-03T15:07:03+5:302020-05-03T15:08:22+5:30

आशा सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आह. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

The question of the safety of the hopefuls is on the agenda | आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Next
ठळक मुद्देमानधनात वाढ करासुरक्षा किट देण्याची मागणी

भुसावळ, जि.जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गंभीर स्थितीत सर्व साथीच्या आजाराचे सर्वेक्षण करण्याचे अत्यंत जोखमीचे काम शहरी व ग्रामीण भागात आशा सेविका व गटप्रवर्तक करीत आहेत; परंतु त्यांना आरोग्यविषयक सुरक्षा किटचे वाटप नाही. तसेच पुरेसे मानधन व जीविताची हमी या बाबींचीसुद्धा पूर्तता नाही. यामुळे आशा सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आह. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरी वा ग्रामीण भाग असो अगदी अगदी गल्लोगल्ली पिंजून काढून कुष्ठरोगपासून हत्तीरोगापर्यंत तसेच टीबीपासून आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी च्या सर्वेक्षणा पर्यंतची कामे आशा वर्कर व प्रवर्तक काकडून करून घेतली जातात या कामाच्या बोजामुळे आशा वर्कर आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे .आशा वरकसँनी एकत्रितपणे एकाच वेळी किती कामे करावीत याचा विचारच शासकीय स्तरावर होताना दिसत नसल्याची खंत आशा सेविकांनी व्यक्त केली आहे.
आरोग्यविषयक सर्व कामे शहर व ग्राम पातळीवर आशा वर्कर्सकडून करून घेतली जातात. ही कामे करीत असताना आशावर्कर्सच्या आरोग्यविषयक बाबींकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबियांचे प्राथमिक तपासणी करून माहिती घेण्याचे काम आशा वर्कर्स करीत आहे. परंतु त्यांना आरोग्यविषयक सुरक्षा नाही.

गेल्या १२ वर्षांपासून राज्यात सुमारे साठ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कामानुसार मोबदल्यावर काम करीत आहेत. कोरोनाचे काम करताना शासनाने त्यांच्या सुरक्षितेची हमी घ्यावी. सप्टेंबर २०१९ पासून जाहीर केलेली मानधनवाढ फरकासह तत्काळ द्यावी. आशा व गटप्रवर्तक तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पुरवित असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते लागू करावेत, अशी मागणी विविध आंदोलनांद्वारे करत पाठपुरावा शासनाकडे करीत आहोत.
- रामकृष्ण बी.पाटील, राज्य कार्याध्यक्ष, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना

Web Title: The question of the safety of the hopefuls is on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.