दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठीही करावी लागते येथे अडथळ््यांची शर्यत, प्रमाणपत्रासाठी पहाटेपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:10 PM2020-01-02T12:10:58+5:302020-01-02T12:15:09+5:30

जिल्हा रुग्णालयात लांबच लांब रांगा

Queue from dawn for the Divorce Certificate in Jalgaon | दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठीही करावी लागते येथे अडथळ््यांची शर्यत, प्रमाणपत्रासाठी पहाटेपासून रांगा

दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठीही करावी लागते येथे अडथळ््यांची शर्यत, प्रमाणपत्रासाठी पहाटेपासून रांगा

Next

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र वितरीत न होण्यासह संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा वेळ दिला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून बुधवारी अर्धा कि.मी.पर्यंत रांगा लागल्या. केस पेपरसाठी फिरवाफिरव केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांकडून केला जात आहे.
दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासह त्यांची नोंदणी केली जाते. यासाठी प्रत्येक आठवड्याला जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी होते. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी दिव्यांग बांधवांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते व तसा संदेश दिव्यांगांना पाठविला जातो. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशी दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. असे असले तरी ही प्रक्रिया पूर्ण करणे अजूनही ग्रामीण भागातील दिव्यांगांना शक्य होत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे अजूनही जिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला मोठी गर्दी होते. त्यात गेल्या आठवड्यात नाताळची सुट्टी असल्याने या आठवडत गर्दीमध्ये अधिकच भर पडली व बुधवार, १ जानेवारी रोजीदेखील पुन्हा लांब रांगा लागल्या.
केस पेपर काढण्यासाठी फिरवाफिरव
बुधवारी मोठी गर्दी झालेली असताना आलेल्या रुग्णांना केस पेपरसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविले जात होते. त्या मुळे प्रत्येकाला तीन-तीन ठिकाणी चकरा मारव्या लागल्या. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जात असताना व एवढ्या प्रमाणातील प्रत्येक व्यक्तीला एकाका ठिकाणी थांबावे लागत असल्याने यात मोठा वेळ गेला. त्यामुळे सर्वच जणांची चांगलीच दमछाक झाली. एक तर अनेक जण पायाने अधू व त्यात ही फिरवाफिरव त्यामुळे दिव्यांगांचा व नातेवाईकांचा मोठा संताप झाला. दिव्यांग बांधवांना किमान एकाच ठिकाणी केस पेपर देऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांगांकडून केली जात होती. सकाळपासून रांगेत उभे असताना एक तर केस पेपर मिळत नसल्याने व तपासणी, इतर प्रक्रियेदरम्यान बराच वेळ जात असल्याने रांगेत उभे असलेले दिव्यांग बांधव हैराण झाले.
पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप
प्रमाणपत्रासाठी तपासणी व इतर प्रक्रियेसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ अशी वेळ असताना प्रत्यक्षात डॉक्टर व संबंधित कर्मचारी वेळेवर येत नसल्याने आलेल्या सर्व दिव्यांगांची प्रक्रिया पूर्ण होत नाही व दर आठवड्याला गर्दी वाढतच जाते. त्यामुळे हा गोंधळ वाढत असल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे. १ रोजीदेखील अनेक जण रांगेत उभे असताना केस पेपर देणे बंद करण्यासह तपासणीही थांबविण्यात आल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे.
पहाटेपासून रांगा
दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधव पहाटे ५ वाजेपासूनच येऊन थांबतात. हळूहळू ही गर्दी वाढत जाऊन मोठी रांग लागते. बुधवार, १ रोजी तर अपेक्षापेक्षा जास्त गर्दी वाढली व अर्धा कि.मी.पर्यंत रांग लागली होती. पुरेसे कर्मचारी व ठरवून दिलेला पूर्ण वेळ देऊन दर आठवड्याला दिव्यांगांचे होणारे हे थांबविण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे केली जात आहे.
राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप
प्रमाणपत्र प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते येऊन वेगवेगळ््या पुढाऱ्यांचे नावे सांगतात व प्रमाणपत्रासाठी आग्रह करतात. त्यामुळेही गर्दी वाढून गोंधळ होत असल्याचे काही जणांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशीही मागणी केली जात आहे.
 

Web Title: Queue from dawn for the Divorce Certificate in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव