कोरोना तुम्हाला अलर्ट करतो ते पटकन ओळखा आणि तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:49+5:302021-04-12T04:14:49+5:30

कोरेानाची लक्षणे ही सर्वसामान्य आहे. सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आता यात जुलाब, उलट्या, डोळे लाल होणे अशा काही नवीन लक्षणांची ...

Quickly identify and investigate what Corona alerts you to | कोरोना तुम्हाला अलर्ट करतो ते पटकन ओळखा आणि तपासणी करा

कोरोना तुम्हाला अलर्ट करतो ते पटकन ओळखा आणि तपासणी करा

Next

कोरेानाची लक्षणे ही सर्वसामान्य आहे. सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आता यात जुलाब, उलट्या, डोळे लाल होणे अशा काही नवीन लक्षणांची भर पडली आहे. रुग्ण गंभीरावस्थेत जाण्यापासून वाचू शकतो, यासाठी या लक्षणांकडे सद्यस्थितीत दुर्लक्ष न करता तर्क वितर्क न लढविता थेट जावून सर्वात आधी निदान करून घ्यावे. अनेक लोक पॉझिटिव्ह अहवाल ऐकून तेथेच अर्धे खचून जातात, मात्र, हा बरा होणारा आजार आहे, या सकारात्मक दृष्टीकोणातून मनाचा समतोल न ढासळू देता याला सामोरे जावे, लक्षणांच्या नुसार उपचारास सुरूवात करावी, एक्सरे, एचआरसीटीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या फुफुस्सांमध्ये किती संसर्ग झाला आहे याची माहिती होऊन जाते. यात स्कोर अधिक असला तरी न घाबरता उपचार घ्यावेत. लक्षणे कोणत्याही स्वरूपाची असली तरी सुरुवातीला रुग्णालयात दाखल व्हावे, प्राथमिक स्तरावर निदान झाल्यानंतर औषधांनी हा विषाणू आटोक्यात येतो.

इन्क्युबेशन बाबत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. यावर प्रकाश टाकणे महत्त्वाचे आहे. इक्युबेशन हे तीन प्रकारचे असते. रुग्णाचे फुफ्फुस जेव्हा काम करीत नाही तेव्हा रुग्णाला गळ्यातून किंवा नाकातून एक ट्यूब् टाकावी लागते, यामुळे रुग्णाच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र, नातेवाईकांना वाटते की, ट्युब टाकली म्हणे रुग्ण दगावणार मात्र, हा गैरसमज आहे.

नुसते झोपून राहू नका

तुम्हाला लक्षणे कोणतीही असली, ऑक्सिजन लावावे लागत असले तरी दिवसभर नुसते झोपून न राहाता, बसल्या बसल्या फुफुसांचे छोटे छोट व्यायाम करावे, यात अनेक यंत्र भेटतात, काही नसल्यास पाण्याच्या बाटली स्ट्रॉ टाकून त्याद्वारे फुंकावे, यामुळे फुफसच्या हालचाली होऊन त्याची कार्यक्षमता वाढेल. धीर न सोडता हिमतीने या दिवसांचा सामना केल्यास तुम्ही आरामशीर यातून बाहेर पडू शकतात.

यामुळे सुरक्षित

दिवसभर रुग्णांशी संपर्क येत असतो, अतिदक्षता विभागात अनेक वेळा विना पीपीईकिट वावरावे लागते, मात्र, अशा परिस्थितीत स्वत: काही नियम घालून दिले आहेत. ज्यामुळे मी सुरक्षित आहे. सर्वांनी हाच विचार केल्यास नियम पाळल्यास तेही सुरक्षित राहू शकतात. यात योग्य, सुस्थितील मास्कचा योग्य पद्धतीनेच वापर करणे, खिशात छोटी सॅनिटायझरची बॉटल ठेवणे, बाहेरच्या वस्तूंना हात लावणे जेवढे टाळता येईल तेवढे टाळावे, बाहेरून घरी आल्यावर सर्वात आधी अंघोळ करून स्वत:ला स्वच्छ करून घ्यावे, सकाळी सकाळी मिठ व गरम पाण्याच्या गुळण्या अशा काही चांगल्या सवयी मी लावून घेतल्या असून सुरक्षित आहे. तुम्हीही हे नियम पाळल्यास सुरक्षित राहू शकतात.

डॉ. इम्रान पठाण, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Quickly identify and investigate what Corona alerts you to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.