रब्बी पीककर्जाचे २१.५२ टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:10 PM2019-12-12T12:10:49+5:302019-12-12T12:11:16+5:30
जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ ...
जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ लाख म्हणजेच २१.५२ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने जेमतेम २.६१ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगामातही यंदा उद्दीष्टाच्या केवळ २६.९८ ट्क्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटपासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. सन २०१९-२० साठी रब्बी कर्जवाटपाचे उद्दीष्ट ३६३ कोटी १९ लाख इतके होते. मात्र त्यापैकी ३ हजार ३८४ शेतकऱ्यांना ७८ कोटी १७ लाख ४९ हजार इतके म्हणजेच २१.५२ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने केवळ २४८ श्ेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख म्हणजेच २.६१ टक्के, राष्टÑीयकृत बँकांनी १४२५ श्ेतकºयांना ४३ कोटी ६३ लाख म्हणजेच २५.९१ टक्के, ग्रामीण बँकांनी ७४ शेतकºयांना १ कोटी २७ लाख म्हणजेच ३७.३८ टक्के, खाजगी बँकांनी १६३७ श्ोतकºयांना २९ कोटी ६८ लाख म्हणजेच ५७.४७ टक्के कर्ज वाटप केले आहे.
खरीपाचेही केवळ २७ टक्के कर्जवाटप
खरीप हंगामातही जिल्ह्यात बँकांनी शेतकºयांना केवळ २६.९८ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बँक ३२.०६ टक्के, राष्टÑीयकृत बँक २०.१५ टक्के, ग्रामीण बँक ३७.७७ टक्के, खाजगी बँकांनी ३६.३० टक्के खरीप पीककर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट २९३६ कोटी ८१ लाखांचे असताना केवळ ७९२ कोटी ४२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.