पाठय़पुस्तकातून रवींद्रनाथ टागोर यांचा नोबेल पुरस्कार विजेते उल्लेख टाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 01:52 PM2017-07-01T13:52:05+5:302017-07-01T13:52:05+5:30

सातवीच्या पुस्तकात ‘द वेलकम’ या विनोदी एकांकिकेचा समावेश

Rabindranath Tagore's Nobel Prize winners avoided mention of textbooks | पाठय़पुस्तकातून रवींद्रनाथ टागोर यांचा नोबेल पुरस्कार विजेते उल्लेख टाळला

पाठय़पुस्तकातून रवींद्रनाथ टागोर यांचा नोबेल पुरस्कार विजेते उल्लेख टाळला

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर,दि.1 - इयत्ता सातवीच्या नवीन अभ्यासक्रमात इंग्रजी पाठय़ पुस्तकात रवींद्रनाथ टागोर लिखित वेलकम ही विनोदी एकांकिका समाविष्ट केली आहे. मात्र प्रारंभी देण्यात आलेल्या लेखकांच्या परिचयात रवींद्रनाथ टागोर  यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराबाबतचा उल्लेख टाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी यंदा इयत्ता 7 वीच्या सुधारीत अभ्यासक्रमाअंतर्गत अनेक बदल केले  माय इंग्लिश बुक सेव्हन’ या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात पान क्रमांक 61 वर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लिखित द वेलकम या विनोदी एकांकिकेचा पाठ (धडा) पुस्तकात आहे तत्पूर्वी लेखक परिचयात रवींद्रनाथ टागोर हे महान लेखक, संगीतकार व विचारवंत होते ते त्यांच्या कविता, गाणे, कादंब:या लघुकथा आदींमुळे त्यांची ओळख होती असा परिचय दिला गेला आहे. रवींद्रनाथ टागोर हे देशातील पाहिले नोबेल पुरस्कार विजेते होते विशेष म्हणजे साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. टागोरांच्या परिचयात साधा हा एक ओळीचा उल्लेख नसल्याने शिक्षणक्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महान व्यक्ती त्यांच्या आत्मचरित्र, पुरस्कार व कार्याने ओळखले जातात. विद्याथ्र्यांना ही ओळख समजण्यास सुलभता झाली असती अशी भावना शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
 
पाठय़ पुस्तकातील पाठात रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल महत्वपूर्ण उल्लेख टाळला गेला. हा उल्लेख असता तर या थोरपुरुषांच्या महान कार्याचा विद्याथ्र्यांना परिचय झाला असता 
 -  संजय कुरकुरे, माध्यमिक शिक्षक मुक्ताईनगर

Web Title: Rabindranath Tagore's Nobel Prize winners avoided mention of textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.