भडगाव येथे दुचाकी चोरीचे रॅकेट उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:27 AM2018-09-03T01:27:33+5:302018-09-03T01:29:53+5:30
भडगाव येथे पोलिसांंनी दुचाकी चोरीचे रॅकेट उघड केले असून सात दुचाकींसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
भडगाव जि. जळगाव : येथे मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघड झाले असून पोलिसांंनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सात गाड्या जप्त केल्या आहेत. पोलीस सूत्रानुसार, यापुर्वी भडगाव पो.स्टे हद्दीत चालू वर्षी ६ गाङया चोरीस गेलेल्या होत्या. त्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी खबऱ्यामार्फत भङगाव बसस्थानक परीसरात सापळा रचण्यात आलेला होता. त्यावेळी चोरीची मोटारसायकल विकण्याकरीता आलेल्या २ जणांना मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले . त्यांची चौकशी केली असता त्यांनी आणखी एका साथीदाराचे नाव सांगून चोरीच्या ६ मोटारसायकली काढुन दिल्या. त्यामुळे एकुण ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपी शफीकखाँ अन्वरखाँ (वय २५) , आणि भूषण शिंदे (वय २२) , दोघे रा. भङगाव अशा दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर एका अल्पवयीन मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासाअंती अजून बरीच चोरीस गेलेली वाहने सापङण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या कारवाईत २ स्प्लेंडर , २ पॅशन प्रो, १ सीटी १००, १ बजाज फोरएस, १ प्लँटीना अशी एकुण ७ वाहने मिळाली आहेत. या प्रकरणी भडगाव पो. स्टे . ला कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, यांचेसह लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, जगन्नाथ महाजन, ज्ञानेश्वर महाजन, राजेंद्र निकुंभ, स्वप्नील चव्हाण आदि पोलीस कर्मचाºयांनी परीश्रम घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली नितीन रावते हे करीत आहेत.