महावीरांच्या विज्ञातूनच समस्यांचे निराकरण शक्य, महावीर जयंतीनिमित्त राहुल कपूर यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:08 PM2018-03-28T12:08:27+5:302018-03-28T12:08:27+5:30
विविध स्पर्धांमधून महावीर भगवान यांच्या जीवन चरित्राचे दर्शन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - आज दहशतवाद, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होण्यासह सर्वत्र भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण भगवान महावीर यांच्या विज्ञानातून शक्य आहे, असे प्रतिपादन युवा परिवर्तनचे व्याख्याते राहुल कपूर यांनी केले. महावीर जयंतीनिमित्त ‘महावीर का महाविज्ञान’ या विषयावर त्यांचे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
माजी मंत्री सुरेशदादा जैन, संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, कांतीलाल कोठारी, विनोद ठोले, नगरसेवक अमर जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी आदी उपस्थित होते.
कपूर पुढे म्हणाले की, आज भेडसावत असलेल्या या समस्यांबद्दल भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा संदेश दहशतवादावर मात करू शकतो, पर्यावरणाच्या प्रश्नावर पाणी बचतीची शिकवण मात करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. या सोबतच त्यांनी बाहेरचे ऐकण्याऐवजी प्रथम स्वत:च्या आतील आवाज ऐका, असेही आवाहन केले.
आत्म्याची शुद्धी महत्वाची
आपण एकमेकांचा द्वेश करून आत्म्याला अपवित्र बनवितो. तसे न करता त्याग तपस्या, स्वाध्याय याद्वारे आत्म्याची शु्द्धी होते, त्याचे अनुकरण करा, असे आवाहनही राहुल कपूर यांनी केले.
विविध स्पर्धांमधून महावीर भगवान यांच्या जीवन चरित्राचे दर्शन
शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सनानिमित्त आयोजित पाच दिवस कार्यक्रमांतर्गत मंगळवारी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून सामाजिक संदेशांसह भगवान महावीर यांच्या जीवनचरित्राचेही दर्शन समाजबांधवांनी घडविले.
भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंगळवारी सकाळी पांझरापोळ संस्थान येथे गोमातेला लापसी अर्पण करण्यात आली. या वेळी समिती प्रमुख दिलीप गांधी, मीना मोमाया, रंजन शहा, मंजू ओसवाल, भावना शहा आदी उपस्थित होते.
स्पर्धांना भरघोस प्रतिसाद
बालगंधर्व नाट्यगृहात ‘मांडना’ (सजावट) स्पर्धा, भगवंतांच्या जीवनावरील भेटकार्ड (ग्रिटींग) स्पर्धा, भगवान महावीर यांची पट्टावली (भगवंतांचे भव) स्पर्धा, महावीराष्टक स्तोत्र स्पर्धा झाल्या. त्यांना समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमध्ये गुरुदेवांची परंपरा, पारंपारिक पद्धती दर्शवून सामाजिक संदेशही दिले.
स्पर्धेतील विजेते (अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, कंसात आयोजक मंडळ) -
- ‘मांडना’ (सजावट) स्पर्धा (लूक अॅँड लर्न) - मेघा छाजेड, स्मिता मुथा, शिवानी कावडिया, शीतल मुनोत, स्नेहा झांबड, आकांक्षा लोढा.
- भेटकार्ड (ग्रिटींग) स्पर्धा (जैन महिला मंडळ)- मेघा कावडिया, स्मिता मुथा, अंजली लापसीया, मिताली लुंकड, तेजल जैन, आकांक्षा लोढा.
- भगवान महावीर यांची पट्टावली (भगवंतांचे भव) स्पर्धा (श्रद्धा मंडळ) - शिल्पा श्रीश्रीमाळ, रुपल राका, तेजल जैन, रुचिता समदडिया, मनीषा डाकलिया.
- महावीराष्टक स्तोत्र स्पर्धा (जेपीपी महिला मंडळ) - तृप्ती रायसोनी, कोमल कावडिया, प्राप्ती कोठारी, ख्याती मुथा, सुमन सिसोदिया.
या स्पर्धांसाठी स्मिता धाडीवाल, रिना कुमट, कल्पना सांखला, भावना कचेरिया, प्रियंका मुथा, संगीता फुलपगार, ललिता श्रीश्रीमाळ, कल्पना कटारिया, सपना छोरिया, शिवानी कावडिया, शिवानी रेदासनी, उषा समदडिया, मिनल समदडिया, शीतल जैन, सुरेखा कोटेचा, ममता कांकरिया, पुष्पा बनवट, ललिता कटारिया यांनी परिश्रम घेतले.