पाचोर्यातील चॉकलेट कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 10:34 PM2021-02-03T22:34:19+5:302021-02-03T22:34:52+5:30
एका चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीतअन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून ब्राऊन शुगर जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : तालुक्यातील वरखेडी रोडवरील एका चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीत अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून तब्बल ३ लाख १० हजार रुपये किंमतीची ब्राऊन शुगर (साखरेचा एक प्रकार) जप्त केली आहे. कंपनीवरही कारवाई करण्यात आली आहे.
वरखेडी रोडवरील जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँड वेअर हाऊसिंग ' येथे ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन जळगाव यांनी दिलेल्या पाचोरा शहरालगत चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यावर २९ डिसेंबर रोजी धाड टाकण्यात आली. यात खुल्या बाजारात विक्रीसाठी तयार करणारे शुगर बॉइलड कन्फेक्शनरी तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बॉइल्डचे उत्पादन सुरु असल्याचे आढळून आले. या ठिकाणी केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना असतानाही शुगर बाईल कन्फेक्शनरी उत्पादन अनारोग्य वातारणात सुरू असल्याचे आढळले. त्या करिता वापरण्यात येणारा कच्चामाल ब्राऊन शुगर चे ५० किलो ग्रॅम चे २०० कट्टे अत्यंत अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले आढळले. या ठिकाणी कचरा धूळ व घाणीचे ठिकाणी ठेवलेला आढळला. यावरून अन्न व औषध प्रशासनाचे जिल्हा सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी ब्राऊनशुगर चा नमुना घेऊन सदर दोनशे कट्टे जप्त केले.