फैजपूर येथे जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 10:49 PM2019-09-29T22:49:29+5:302019-09-29T22:52:01+5:30

जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने धाड टाकून पावणे दोन लाखाच्या रोख रकमेसह मोबाइल व मोटारसायकल असा एकूण तीन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

The raid on the gambling base at Faizpur | फैजपूर येथे जुगार अड्ड्यावर धाड

फैजपूर येथे जुगार अड्ड्यावर धाड

Next
ठळक मुद्देआतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पावणेदोन लाखांच्या रोकडसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत१४ जणांंविरुद्ध गुन्हा दाखलसाकेगावातही पत्त्याच्या डावावर छापा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील तलाठी कार्यालयाजवळील एका दुर्गाेत्सव मंडळाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने धाड टाकून पावणे दोन लाखाच्या रोख रकमेसह मोबाइल व मोटारसायकल असा एकूण तीन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह.े
स्थानिक पोलिसांना सुगावा न लागता ही आतापर्यंतची केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलीस सूत्रांनुसार, तलाठी कार्यालयाजवळील शिवनेरी दुर्गा मंडळाजवळ आडोशाला रिकाम्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकाने ही धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम एक लाख ६८ हजार ७४० रुपये, ६६ हजार २०० रुपये किमतीचे १० मोबाईल, एक लाख ३५ हजार किमतीच्या पाच मोटारसायकली असा एकूण तीन लाख ६९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.
या प्रकरणी रवींद्र तुकाराम सरोदे, फैजपूर, विश्वनाथ रामदास शिंदे (रा.तळेगाव), सय्यद अलीम सय्यद महेबूब, राहुल जयंतराव चव्हाण, अनिल बाबू काठे, दुर्गादास डिगंबर भंगाळे (सर्व रा.सावदा), उदय उर्फ अप्पा बाबूराव चौधरी, शेख शकीर शेख शब्बीर, रिजवानअली कासम अली, अय्युबखान शब्बीरखा, (सर्व रा.फैजपूर), सय्यद रफिक सय्यद शब्बीर, चांदखा बाबू तडवी रा.भालोद, भालचंद्र काशिनाथ शिंदे, सुरेश लक्ष्मण ठोकरे (रा.गाते) अशा १४ जणांविरुद्ध पो.कां.ॅ विजय नामदेव सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.


साकेगावातही पत्त्याच्या डावावर छापा चार जणांवर कारवाई
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे भवानीनगरमध्ये भवानी मंदिराच्या पायथ्याशी जुगार खेळताना चार जणांवर कारवाई करण्यात आली.
वाघूर नदी पात्राजवळ उंच टेकडीवर असलेल्या भवानी माता मंदिराजवळ पत्ते खेळताना बळीराम कोळी, गणेश सुतार, हेमंत राणे, दिलीप पाथरवट यांच्यावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ विठ्ठल फुसे, पो.ना.विजय पोहेकर, विजय सपकाळे, नितीन सपकाळे, जगदीश भोईर यांनी जुगार खेळ खेळताना कारवाई केली. ६४० रुपये रोख, पत्त्याचा कॅट ताब्यात घेण्यात आला.

Web Title: The raid on the gambling base at Faizpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.