हॉटेलच्या तळमजल्यावरील जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:57 PM2020-12-15T19:57:57+5:302020-12-15T19:58:10+5:30

१९ जणांवर गुन्हा : सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई

Raid on the gambling den on the ground floor of the hotel | हॉटेलच्या तळमजल्यावरील जुगार अड्डयावर छापा

हॉटेलच्या तळमजल्यावरील जुगार अड्डयावर छापा

Next

जळगाव : जिल्हा परिषद चौकाजवळील बॉम्बे हॉटेलच्या तळमजल्यावर सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत पथकाने १९ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जुगाऱ्यांकडून २ लाख १० हजार ९४६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईत पोलिसांनी विकास रमेश सोनवणे (वय ४५ रा. शनीपेठ), फिरोज गुलाब पटेल (वय ३८ रा. सदाशिव नगर), हेमंत रमेश शेटे (वय २८ कांचननगर), अनिल रामभाऊ छडीकर (वय ५१ रा. शिवाजीनगर), अशोक ओंकार चव्हाण (वय ६२ रा.के.सी.पार्क), घनशाम लक्ष्मणदास कुकरेजा (वय ६१ रा. सिंधी कॉलनी), अनिल भिमराव ढेरे (वय ५२ रा लक्ष्मीनगर), पंढरी ओंकार चव्हाण (वय ५०,रा. त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (वय ६१ रा. गणपती नगर), रामदास दगडू मोरे (वय ५९ रा. शाहूनगर), नितीन परशुराम सुर्यवंशी (वय ४०,रा. हरिओम नगर), नजीर शफी पिंजारी (वय ५०,रा. कोळीपेठ), पंकज वामन हळदे (वय १९ रा.चौघुले प्लॉट), आसीफ अहमद खाटीक (वय ४६ रा. पिंप्राळा हुडको), ब्रिजलाल आनंदराम वालेचा (वय ६८ रा. लक्ष्मीनगर), मोहम्मद सलिम मोहम्मद ईस्माईल (वय ६५, रा. इस्लामपुरा), सलीम खान मुसा खान (वय ५३ रा.शिवाजीनगर), नूरा गुलाम पटेल (वय ३५ रा. सुरेशदादा जैन) नगर व पवन गुरुदासराम लुल्ला (वय ४२ रा.सिंधी कॉलनी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच टीव्हीचा सेटअप बॉक्स, मोबाईल, दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे करीत आहेत.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, विकास महाजन, उमेश भांडारकर, सचिन वाघ, रवींद्र मोतीराया, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, अशोक फुसे यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Raid on the gambling den on the ground floor of the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.