हॉटेलच्या तळमजल्यावरील जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:52+5:302020-12-16T04:31:52+5:30
या कारवाईत पोलिसांनी विकास रमेश सोनवणे (वय ४५ रा. शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (वय ३८ रा. सदाशिव नगर), हेमंत ...
या कारवाईत पोलिसांनी विकास रमेश सोनवणे (वय ४५ रा. शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (वय ३८ रा. सदाशिव नगर), हेमंत रमेश शेटे (वय २८ कांचननगर), अनिल रामभाऊ छडीकर (वय ५१ रा. शिवाजी नगर), अशोक ओंकार चव्हाण (वय ६२ रा.के.सी.पार्क), घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा (वय ६१, रा. सिंधी कॉलनी), अनिल भीमराव ढेरे (वय ५२ रा लक्ष्मीनगर), पंढरी ओंकार चव्हाण (वय ५०,रा. त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (वय ६१ रा. गणपती नगर), रामदास दगडू मोरे (वय ५९ रा. शाहूनगर), नितीन परशुराम सूर्यवंशी (वय ४०,रा. हरिओम नगर), नजीर शफी पिंजारी (वय ५०,रा. कोळीपेठ), पंकज वामन हळदे (वय १९ रा.चौघुले प्लॉट), आसीफ अहमद खाटीक (वय ४६ रा. पिंप्राळा हुडको), ब्रिजलाल आनंदराम वालेचा (वय ६८, रा. लक्ष्मी नगर), मोहम्मद सलिम मोहम्मद ईस्माईल (वय ६५, रा. इस्लामपुरा), सलीम खान मुसा खान (वय ५३ रा.शिवाजी नगर), नुरा गुलाम पटेल (वय ३५ रा. सुरेशदादा जैन) नगर व पवन गुरुदासराम लुल्ला (वय ४२ रा.सिंधी कॉलनी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तसेच टीव्हीचा सेटअप बॉक्स, मोबाइल, दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक नितीन गणपुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, विकास महाजन, उमेश भांडारकर, सचिन वाघ, रवींद्र मोतीराया, सहायक फौजदार विनयकुमार देसले, अशोक फुसे यांच्या पथकाने कारवाई केली.