किनगाव येथे झन्ना-मन्नावर छापा, ११ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:26+5:302021-07-03T04:12:26+5:30
यावल : तालुक्यातील किनगाव-इचखेडा रस्त्यावर एका शेताजवळील बखळ जागेवरील पत्री शेडमध्ये ५२ पत्त्यांचा खेळ (झन्ना-मन्ना) सुरू असताना ...
यावल : तालुक्यातील किनगाव-इचखेडा रस्त्यावर एका शेताजवळील बखळ जागेवरील पत्री शेडमध्ये ५२ पत्त्यांचा खेळ (झन्ना-मन्ना) सुरू असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. ११ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १५ हजार रुपयांसह वाहने व मोबाइल असा पाच लाख ४२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एकाच आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरासह तालुक्यात टाकलेला हा दुसरा मोठा छापा आहे. त्यामुळे तालुक्यात अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संशयिताकडून १५ हजार २० रुपयांची रोकड, तसेच चार लाख १५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली व मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाचक तथा सपोनि एस.एच. अखेगावकर, हे. कॉ. प्रवीण पाटील, जमील अहमद खान, भूषण मांडोळे, रवींद्र पाटील, आसिफ पिंजारी, भरत डोके यांचा समावेश आहे.
यांना घेतले ताब्यात
किनगाव-इचखेडा रस्त्यावरील दगडू पाटील यांच्या शेताजवळील पत्री शेडमध्ये गुरुवारी सायंकाळी ५२ पत्त्याचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. तेव्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. राजू तडवी नावाची व्यक्ती हा जुगार खेळवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कडू साळुंके, संजय कोळी, वासुदेव कोळी, रवींद्र पाटील, ज्ञानदेव पाटील, रफिक शहा, शेख शरीफ हसन, गणेश भंगाळे, विजय साळुंखे, इस्माईल तडवी, विलास पाटील अशा ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर १० ते १२ जण पोलीस पथक आल्याचे पाहून पसार झाले.