जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:59+5:302021-05-01T04:14:59+5:30
जळगाव : कांचननगर भागातील प्रशांत चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा ...
जळगाव : कांचननगर भागातील प्रशांत चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा हजार २८० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, आठ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचननगर भागात असलेल्या प्रशांत चौकात काही व्यक्ती बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी प्रशांत नगरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. विवेक ऊर्फ भय्या मधुसूदन सपकाळे, गजानन वसंत चंदनकर, रोशन आप्पा ऊर्फ प्रभाकर पाटील, सागर भिवलाल कोळी, पंकज सुपडू मोहासे, नामदेव सुकदेव माळी, हितेश संजय निंबाळकर आणि जयेश शरद मराठे (सर्व रा. प्रशांत चौक, कांचननगर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याजवळून सहा हजार २८० रुपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. कॉन्स्टेबल राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कावडे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, अनिल कांबळे, अमित बाविस्कर, राहुल पाटील यांनी केली.