रेल्वे प्रशासनाने केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:51+5:302021-06-06T04:12:51+5:30

व्हीपीयू रॅकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त केळी भरल्याचा ठपका रावेर, जि. जळगाव : रावेरहून दिल्लीकडे जाणाऱ्या केळी वॅगनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त केळी ...

The railway administration did | रेल्वे प्रशासनाने केला

रेल्वे प्रशासनाने केला

Next

व्हीपीयू रॅकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त केळी भरल्याचा ठपका

रावेर, जि. जळगाव : रावेरहून दिल्लीकडे जाणाऱ्या केळी वॅगनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त केळी भरल्याचा ठपका ठेवत रेल्वेने २४ शेतकऱ्यांना तब्बल चार लाखांचा दंड केला आहे. या अजब प्रकारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर केळी फळबागायतदार युनियनतर्फे २ जून रोजी सायंकाळी २४ व्हीपीयू (पार्सल व्हॅन) बोगींचा रॅक केळीने भरण्यात आला होता. प्रत्येक व्हीपीयू बोगीत २१ टनापेक्षा कमी केळीमाल होता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी झाँसी स्थानकावरील रेल्वे भुईकाट्यावर धावत्या स्थितीत या व्हीपीयू रॅकचे वजन करण्यात आले. यात पूर्ण २४ बोगींमध्ये २३ टनापेक्षा जादा केळी भरल्याचे आढळून आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नया आझादपूर मालधक्क्यावरील आडत्यांकडून किमान १५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत, असा एकूण ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला. आता हे अडते शेतकऱ्यांना पैसे देताना दंडाची रक्कम कापून घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

यासंबंधी रावेर स्टेशन केळी फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील व सचिव ॲड. आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन दंडाची रक्कम परत मिळण्याची मागणी केली. मात्र, दंडाची रक्कम परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

Web Title: The railway administration did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.