अकार्यक्षम कर्मचाऱ्यांची रेल्वे बोर्डाने माहिती मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:06+5:302021-01-08T04:49:06+5:30
रेल्वे बोर्डाने रेल्वेतील कर्मचाऱ्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती जाहीर केली आहे; मात्र रेल्वेत सेवा बजाविताना ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ...
रेल्वे बोर्डाने रेल्वेतील कर्मचाऱ्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती जाहीर केली आहे; मात्र रेल्वेत सेवा बजाविताना ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांनी रेल्वेत सेवा कशा पद्धतीने बजावली, त्यांनी नियमित सेवा बजावली का, त्यांची सेवेतील आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त होती का, यातून रेल्वेचे काही नुकसान झाले का, संबंधित कर्मचाऱ्याचा उत्कृष्ठ कामाबद्दल गौरव झाला आहे,आदी त्यांच्या कामाचा `परफार्मन्स` बघितला जाणार आहे, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला काही व्याधी आहेत का, याचीही माहिती घेतली जात आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसेल, त्या कर्मचाऱ्यांना वयाच्या ५५ नंतर सेवानिवृत्तीच्या ६० वर्षांपर्यंत सेवेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत भुसावळ विभागातील येथील रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला. तर हा जुनाच नियम असून, दरवर्षी ही प्रक्रिया होत असल्याचेही सांगितले.