रेल्वे दुहेरीकरणाची सुरक्षा चाचणी
By admin | Published: March 30, 2017 12:34 AM2017-03-30T00:34:49+5:302017-03-30T00:34:49+5:30
अमळनेर : होळ रेल्वे स्थानकापासून तपासणीस सुरवात, मार्गावरील प्रत्येक स्थानकाची पहाणी
अमळनेर : पश्चिम रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, बुधवारी रेल्वे सुरक्षा विभागातर्फे होळ ते अमळनेर या जवळपास 40 किलोमीटर दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील रूळांची चाचणी घेण्यात आली.
ही चाचणी करण्यासाठीे पश्चिम रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी अधिकारी व 11 मोटार ट्रॉली घेऊन, होळ रेल्वेस्थानकापासून तपासणीस सुरूवात केली.
या पथकाने रेल्वे मार्गावरील पूल, रुळाचे सांधे, चाव्या, फाटक, रेल्वेच्या विद्युत तारा, स्टेशन, बोगदे, सिग्नल, सुरक्षेचे उपाय यांची अतिशय काटेकोरपणे तपासणी केली. नवीन मार्ग प्रवाशी रेल्वे गाडी धावण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही याचाही तपासणी करून आढावा घेतला. हे पथक रात्री 7.30 वाजेच्या सुमारास अमळनेर स्थानकावर पोहोचले.
दरम्यान, रेल्वेचे मोठे अधिकारी येणार असल्याने आज स्टेशन चकाचक करण्यात आलेले होते. नवीन प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लान्स तयार करण्यात आले असून त्यात आलेल्या अधिका:यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पश्चिम रेल्वे विभागाचे अनेक अधिकारी यानिमित्ताने स्टेशनवर उपस्थित होते.
अमळनेर स्थानकांवर स्टेशन प्रबंधक एस.एच.तायडे यांनी या पथकाचे स्वागत केले.
रेल्वे सल्लागार समितीतर्फे निवेदन
पहाणीसाठी आलेल्या पथकाला अमळनेर रेल्वे सल्लागार समितीने विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यात नवीन आणि जुना प्लॅटफार्म समांतर असावेत, तिकीट कार्यालय मध्यवर्ती भागात पाहिजे, रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता ग्रामीण रुग्णालयातून जाणारा असावा, रुळाच्या दोन्ही बाजूला प्रवाशी प्रतीक्षालाय असावे, वयोवृद्धांसाठी रॅम्प असावा, पाकिर्ंग सुविधा, मॉडेल स्टेशनच्या सुविधा निर्माण कराव्यात आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदनावर प्रितपालसिंग बग्गा, जुलाल पाटील, हरचंद लांडगे, दिलीप जैन, जय कोठारी, निर्मल कोचर, भरातसिंग परदेशी यांच्या स्वाक्ष:या आहेत. (वार्ताहर)