रेल्वे अधिका:याला दुर्मीळ नाणी व माचीस संकलनाचा छंद
By admin | Published: May 26, 2017 12:39 PM2017-05-26T12:39:50+5:302017-05-26T12:39:50+5:30
रेल्वे अधिकारी राकेश भावसार यांच्या संग्रहात देश-विदेशातील दुर्मीळ नाणी
Next
ऑनलाईन लोकमत/पंढरीनाथ गवळी
भुसावळ,दि.26- मूळ मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आणि भुसावळ येथील वाणिज्य विभागातील अधिकारी राकेश भावसार यांना विविध देशांमधील माचीस (काडय़ापेटी) चे खाली खोके व देशविदेशातील नाणी गोळा करण्याचा अनोखा धंद आहे. तो त्यांनी रेल्वेची नोकरी सांभाळत जोपासला आहे. त्यांच्याकडील संग्रहात भारतासह विविध देशांमधील 8 हजार माचीसच्या खाली खोक्यांचा संग्रह आहे. त्यामुळे त्यांच्या या जगावेगळ्या छंदाचे कौतुक होत आहे.
गेल्या 20-25 वर्षापासून माचीसचे खाली खोके गोळा करण्याचा त्यांचा हा छंद त्यांना एका विक्रमाकडे नेत आहे. भुसावळ रेल्वेतील वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य निरीक्षक व सध्या क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत इन्स्ट्रक्टर म्हणून सेवेत असलेले राकेश भावसार यांनी सुमारे 20-25 वर्षापूर्वी माचीसचे खोके गोळा करायला सुरुवात केली होती. त्या काळात खर्चासाठी असलेल्या पैशातून ते माचीस विकत घेत होते.
कच:याच्या ढिगा:यात व कचराकुंडीत माचीसचे खोके आढळल्यास न संकोचता ते तो खोका पटकन उचलून घेतात. भावसार म्हणाले की, माचीस गोळा करण्याचा जो छंद आहे त्याला ‘फिल्यूमीनिस्ट’ असे म्हटले जाते, ते स्वत: आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक ग्रुप (कलेक्टर्स ग्रुप) चे सदस्य आहेत. ते म्हणाले मी भारतीय माचीस विदेशात पाढवितो. विदेशी मित्र मला त्यांच्या देशातील माचीस भारतात पाठवितात.
माचीस विविध आकारात उपलब्ध असते.
सध्याच्या काळात लाईटर्स आल्याने विदेशात माचीस वापर कमी झाला आहे. मात्र पोलंड, बल्गेरिया, स्वीडन, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये माचीस शंृखलेच्या (सिरीज) रुपात असते. जसे फुटबॉल सिरीज, हॅरिटेज कार कलेक्शन, पर्यावरण सिरिज, फुलांची सिरिज आदी.
राकेश भावसार यांच्या संग्रहात 50 पेक्षा अधिक देशांमधील 400 विदेशी चलनी नाण्यांचा संग्रह आहे.विदेशात त्यांचे 70 पेक्षा जास्त मित्र आहेत ते त्यांना या कामात मदत करीत असतात. त्यांच्या रेल्वेतील सेवेमुळे विदेशातील विविध देशांमधील लोकांशी त्यांची ओळख झाली व त्याचे नंतर मैत्रित रुपांतर झाले. कोणत्याही रेल्वे स्थानकावर त्यांना विदेशी पर्यटक भेटले तर ते त्यांच्याशी बोलतात. त्यांना शक्य असेल ती मदत करतात. त्यांचे भाऊ रितेश व नीलेश भावसार जपान आणि अमेरिकेत गेले तेव्हा येताना त्यांनी तेथील चलनी नाणी आणि माचीस (रेपर) चे कव्हर आणले. अशा माध्यमातून त्यांचा संग्रह वाढत चालला आहे.