रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 02:47 PM2020-04-22T14:47:21+5:302020-04-22T14:48:34+5:30

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Railway station lockdown, many lost their jobs | रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

Next
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर शुकशुकाटफलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेतेखाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाची प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भुसावळ विभागात भुसावळ रेल्वेस्थानकावर दररोज १८० पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा करतात. स्थानकावरील फलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे पाय मेहनत करून कुटुंबियांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा याकरिता दोन पैसे मिळावे या हेतूने डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे मात्र गेल्या २३ मार्चपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी करण्यात आले असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रेल्वे स्थानकावर फूड प्लाझा, सेल किचन, फळांचे स्टॉल, खेळणीचे स्टॉल, तीन वॉटर वेंडिंग मशिन याद्वारे तिनशेपेक्षा जास्त मजूर चहा, वडापाव, स्नॅक्स, कोल्ड्रिंक विकून आपला उदरनिर्वाह भागवत होते.
रेल्वेस्थानकाबाहेरील व्यावसायिकांनी वरही उपासमारीची वेळ
स्थानकावरील जी स्थिती हातमजुरांची आहे ती स्थिती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील असलेले छोटे-मोठे उद्योगधंदे चहा, फराळाचे दुकाने बंद पडल्यामुळे रेल्वेच्या आवारातसुद्धा असलेले दुकान बंद असल्याने सुमारे आठशेपेक्षा जास्त विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रेल्वेच्या प्रवाशांचे ओझे वाहून नेणारे कुलीसुद्धा रेल्वे बंद असल्यामुळे अडचणीत आले आहेत. रेल्वे अवलंबून असणारे हमाल, आॅटो चालक, चहापान हमालांची स्थावर मालमत्ता नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व तळागाळातील जीवन जगत होते. उदरनिर्वाह कसा चालवावा याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे यांना चांगलाच फटका बसलाय. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिवार्हाची व्यवस्था करावी. विशेषत: ज्या मक्तेदारांकडे मजूरवर्ग कामावर होते त्यांनी तरी निदान या परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक सहकार्यातूून जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लॉकडाऊन नंतर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आतापासूनच नियोजन हवे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिले लॉकडाऊन व १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविले. परिस्थिती आटोक्यात असली तर दुसरे लावून जर तीन महिन्यानंतर उघडलेस तर रेल्वे स्थानकावर येणाºया प्रत्येक प्रवाशांची आरोग्य तपासणी वावी व प्रवास सुरक्षित व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले तर येणारा काळामध्ये कोरोनाचा धोका टळू शकतो मात्र यासाठी चोख नियोजन हवे आहे नाहीतर ‘प्यास लगी तब खोदा कुवा’ असे व्हायला नको यावर गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेस्थानकावरील हातावर पोट भरणारे वेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वेला सेवा बजावणाºया वेंडर्सकडे लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे कुली बांधवांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली निदान तेवढे तरी मदत करावी, उभ्या आयुष्यापासून रेल्वेसाठी सेवा बजावत आहेत.
-कय्युम खाटीक, सचिव, रेल्वे वेंडर्स असोसिएशन, भुसावळ



 

Web Title: Railway station lockdown, many lost their jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.