रेल्वे स्थानकावर झोपेतच प्रवाशाचा मोबाइल लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:03+5:302021-09-27T04:17:03+5:30
भुसावळ : हायटेक रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’चा प्रत्यय येथे एका प्रवाशाला ...
भुसावळ : हायटेक रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’चा प्रत्यय येथे एका प्रवाशाला आला.
सेवाग्राम एक्स्प्रेसने शेगाव येथे जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रवाशाला झोप लागल्याने झोपेचा फायदा घेत अज्ञाताने त्याचा मोबाइल लांबवला. ही घटना २४ च्या रात्री १०:२५ वाजता घडली. याप्रकरणी जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेगाव येथील रहिवासी जगन्नाथ घुले हे भुसावळ येथून सेवाग्राम एक्स्प्रेसने शेगावला जाण्यासाठी भुसावळ स्थानकावर थांबले होते. गाडीची वाट पाहत असताना त्यांना झोप लागली. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवला. याप्रकरणी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार सुधीर पाटील तपास करीत आहेत.