भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:38 PM2018-01-16T17:38:43+5:302018-01-16T17:43:05+5:30

भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच डीएमआर यादव यांना निलंबित करा, झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या मागण्यांसाठी रिपाईतर्फे मंगळवारी सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

Railway Stop Movement in Pachora, against Bhima-Koregaon incident | भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलकांनी काशी एक्स्प्रेस रोखून धरल्याने काही काळ रेल्वेसेवा विस्कळीत रिपाईतर्फे पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन ३० ते ३५ कार्यकर्ते घोषणा देत झेंडे फडकवत रेल्वे स्थानकात झाले दाखल

आॅनलाईन लोकमत
पाचोरा, दि.१६ : भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच डीएमआर यादव यांना निलंबित करा, झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या मागण्यांसाठी रिपाईतर्फे मंगळवारी सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काशी एक्स्प्रेस रोखून धरल्याने काही काळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली.
रिपाइचे बापू गायकवाड ,विनोद अहिरे,खंडू सोनवणे, राजेश मापारी, रोहित ब्राह्मणे, दीपक शेजवळ,अशोक मोरे ,यशवंत देहडे, दीपक वाकडे, भीमराव शिरसाट,भीमराव खैरे, प्रकाश मोरे, नीलेश देहडे यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्ते घोषणा देत झेंडे फडकवत रेल्वे स्थानकात दाखल झाले. काशी एक्सप्रेस थांबताच गाडी समोर येऊन गाडी रोखली आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. यावेळी आरपीएफचे ३ अधिकारी १४ पोलीस, जीआरपीचे ४ ,स्थानिक पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी, सचिन सानप यांच्यासह २० ते २५ पोलीस असा बंदोबस्त स्थानकावर होता. आंदोलनामुळे काही काळ रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली.

Web Title: Railway Stop Movement in Pachora, against Bhima-Koregaon incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.