मुंबईच्या दक्षता पथकाकडून काळ्या बाजारातील लाखो रुपयांचे रेल्वे तिकिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 05:48 PM2017-04-09T17:48:37+5:302017-04-09T17:48:37+5:30

दुस:याच्या पर्सनल लॉग-इनवर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण करुन काळाबाजार करणा:याचा मुंबईच्या व्हिजिलन्स व रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने रविवारी दुपारी पर्दाफाश केला.

Railway ticket seized by millions of rupees in black market from Mumbai's Vigilance squad | मुंबईच्या दक्षता पथकाकडून काळ्या बाजारातील लाखो रुपयांचे रेल्वे तिकिट जप्त

मुंबईच्या दक्षता पथकाकडून काळ्या बाजारातील लाखो रुपयांचे रेल्वे तिकिट जप्त

Next

 जळगाव,दि.9- दुस:याच्या पर्सनल लॉग-इनवर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण करुन काळाबाजार करणा:याचा मुंबईच्या व्हिजिलन्स व रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने रविवारी दुपारी पर्दाफाश केला. विकास केदारनाथ बिर्ला (वय 48 रा.नवी पेठ, जळगाव) याला अटक केली आहे. त्याच्याजवळ लाखो रुपये किमतीची 50 च्यावर तिकीटे आढळून आली आहेत.

जळगावच्या विकास मशीनरी व निखील एजन्सी या एआरटीसीच्या अधिकृत एजंटकडून दुस:या व्यक्तीच्या पर्सनल लॉग-इन वर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण करुन रेल्वे तसेच दुस:या व्यक्तींची फसवणूक होत असल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेच्या व्हिजीलन्स पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाचे मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल क्षीरसागर, जळगाव रेल्वे सुरक्षा बलाचे गोकुळ सोनोनी, भुसावळ वाणिज्य विभागाचे मुख्य तिकीट निरीक्षक प्रशांत ठाकूर, सीआयपी अतुल टोके यांच्या पथकाने रविवारी दुपारी एक वाजता सतरा मजली इमारतीसमोरील विकास मशीनरी या एजन्सीवर धाड टाकली. 
 

Web Title: Railway ticket seized by millions of rupees in black market from Mumbai's Vigilance squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.