रेल्वेचे काम आता पेपरलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:21 PM2020-06-16T22:21:38+5:302020-06-16T22:21:46+5:30
कोरोनाचा असाही प्रभाव : ई-आँफिस माध्यमाचा अधिक वापर
भुसावळ : कोरोना ची भीती आज प्रत्येकाच्या मनात आहे , अविरत चालणारे रेल्वेचे चाक असो, विमानसेवा असो किंवा दळण-वळण असो क्षणात न दिसणाऱ्या अत्यंत सूक्ष्म विषाणूने सर्वांना थांबविले, याच बरोबर कोरोनाने निसर्गप्रेमदेखील शिकवले. भुसावळ रेल्वे विभागाचा मोठा तामझाम पेपरलेस होऊन प्रदूषण मुक्त झाला आहे. सध्या ई-आॅफिस च्या माध्यमातून भुसावळ रेल्वे भागाचे कार्य सुरू आहे.
कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मार्च २२ पासून जनता कर्फ्यू व त्यानंतर सातत्याने लॉकडाऊन लावण्यात आले. इतिहासात कधी न थांबणारी रेल्वे चाके कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबले.
ज्यांच्याकडे अगदी मिनिटाचा वेळ नव्हता अशा सगळ्यांना निसर्गाने घरी बसविले. मात्र कोरोना सोबतच व्यवहार ,जनजीवन सुरळीत व्हावे याकरिता मनुष्याने पर्यायी मार्ग शोधून काढले. भुसावळ रेल्वे विभागात कागदावर होणारे संपूर्ण कार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस म्हणजे ई- आॅफिसच्या माध्यमातून सुरू आहेत.
इगतपुरी ते अमरावती ५३७ किलोमीटर, इगतपुरी ते भुसावळ ३०८ किलोमीटर, अमरावती ते भुसावळ २२९किलोमीटर, इगतपुरी ते खंडवा ४३२ किलोमीटर व खंडवा -भुसावळ १२४ किलोमीटर या व्याप्तीच्या भुसावळ रेल्वे विभागात तब्बल ११९ रेल्वेस्थानक आहेत व या सर्व रेल्वे स्थानकावर कार्य ई आॅफिसच्या माध्यमातून केले जात आहे .
पूर्वी कुठलेही कार्यालयीन कामे करण्यासाठी कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता. एका फाईलमध्ये एका कागदाचे मठ्या प्रमाणात प्रतीलीपी करून लावावे लागत होते, यामुळे कागदाच्या वापराने पर्यावरणाचा ºहास होत होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे सर्व कामे ई- आॅफिस च्या माध्यमातून केली जात आहे .मोठ्या प्रमाणात लागणारे कागद वापरणे हा प्रकार इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे .भुसावळ विभागात मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या विविध टेंडरचे कामे सुरू आहेत, आता हीे सर्व कामेही यशस्वीरित्या ई- आॅफिसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
ई -आॅफिस च्या माध्यमातून कार्यात गतिमानता आली आहे. सुरक्षित व पारदर्शकपणे हे काम पर्यावरणपूरक होत असून ही काळाची गरज सुद्धा आहे.
-आर. के. शर्मा, सीनियर डीसीएम, रेल्वे भुसावळ विभाग.