भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:31 AM2019-05-20T00:31:02+5:302019-05-20T00:31:51+5:30
मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली.
भुसावळ, जि.जळगाव : मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली.
याबाबत संघटनेने म्हटले आहे की, रेल्वे विभागात रनिंग लोको पायलट म्हणून दीड हजार कामगार काम करीत आहे. या कामगारांना मिळणारा गणवेश भत्ता अत्यल्प स्वरूपात दिला जातो. प्रत्यक्षात मात्र पाच हजार रुपये मंजूर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती लोको रनिंग असोसिएशन स्टाफने मागवलेल्या माहितीच्या आधारानुसार समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या लोको रनिंग स्टाफ ने १५ मेपासून ड्युटीवर साधा गणवेश व ओळखपत्र घालून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
लोको रनिंग असोसिएशन स्टाफला गणवेश भत्ता योग्य स्वरूपात न मिळत असल्याने त्यांनी माहितीच्या आधाराचा वापर करून सर्व माहिती मागवली. याते अतिशय धक्कादायक माहिती निदर्शनात आली आहे. सन २०१६ पासून सातव्या पेनुसार प्रतिवर्षी ५ हजार रुपये गणवेश भत्ता आॅनड्युटी कर्मचाऱ्यांना मंजूर झालेला आहे. प्रत्यक्षात गणवेश भत्ता अत्यल्प दिला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.