रेल्वेत प्रवाशांना लुटणा:या टोळीला पकडले

By admin | Published: March 17, 2017 12:30 AM2017-03-17T00:30:14+5:302017-03-17T00:30:14+5:30

दरोडय़ाचा गुन्हा दाखल : चाकू, मिरची पूड हस्तगत; शहरात दरोडय़ाचे नियोजन

RAILWAYS RAILWAYS RAILWAY: The gang was caught | रेल्वेत प्रवाशांना लुटणा:या टोळीला पकडले

रेल्वेत प्रवाशांना लुटणा:या टोळीला पकडले

Next

जळगाव : रेल्वेत प्रवाशांशी दादागिरी करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणा:या टोळीतील चार जणांना पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले असून त्यातील दोन जण फरार झाले आहेत. दरम्यान, पकडलेल्या चौघांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू व दोर असे साहित्य आढळून आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच ही टोळी फिरत होती. दरम्यान, त्यांच्याविरुध्द दरोडय़ाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत-भसावळ या पॅसेंजरमध्ये सहा ते सात जणांची टोळी असून ती प्रवाशांशी दादागिरी करुन मोबाईल हिसकावत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार ठाकूर यांनी सहायक निरीक्षक दीपक गंधाले, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, नवजीत चौधरी, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, अमोल विसपुते व गणेश शिरसाळे यांचे पथक रेल्वे स्टेशनच्या आउटरला पाठविले. सकाळी आठ वाजता या पथकाने सापळा लावला होता. मात्र ही टोळी त्या जागेवर नाही तर हॉटेल निसर्गच्या पाठीमागे थांबल्याची माहिती गंधाले यांना मिळाली. त्यामुळे हे पथक तेथे आले असता पोलीस पाहताच त्यांनी पळ काढला.
चौघे जाळ्यात, दोन फरार
पाठलाग करत असताना पोलिसांनी शेख कदीर शेख इब्राहीम (वय 20) वसीम शेख अजीज (वय 21) व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गणेश शिरसाळे व नवजीत चौधरी या पोलिसांनी बारीक गल्लीतून दोघांचा पाठलाग केला, मात्र ते निसटण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू, दोर तसेच एक सीम कार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. या टोळीकडून शहरात जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचे नियोजन होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.

 

अमळनेरच्या भावंडाशी झाली झटापट
पोलिसांनी पकडलेल्या टोळीने लक्ष्मण पोलाद कोळी व रमेश कोळी (रा.अमळनेर)या दोन भावंडाशी झटापट झाली होती.दोन्ही भाऊ हे  सकाळी 7.30 वाजता अमळनेर येथे गाडीत चढताना चोरटय़ाने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन लांबवून पळ काढण्याचा प्रय} केला. चोरटय़ाच्या हातातून कोळी यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रय} केला असता त्यांनी गाडीतून फेकून देण्याची धमकी दिली. या दोघ भावांनी घडलेला प्रकार जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना सांगितला.जळगावला आल्यावर शुभम रघुनाथ तायडे, मुन्ना संतोष सोनवणे, सुनील दुर्योधन सैंदाणे, भगवान काशीनाथ सोनवणे यांनी कोळी भावंडाना धीर देत 4 चोरटय़ांना पकडले, त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. अन्य दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले. नंतर या चोरटय़ांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना विचारले असता आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार चोरटय़ांना आम्ही पकडले. त्यांचा रेल्वेत कोणाशी वाद झाला हे माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

Web Title: RAILWAYS RAILWAYS RAILWAY: The gang was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.